केस गळणे थांबवण्यासाठी घरगुती उपाय (Home Remedies for Hair Loss)

नारळाचं तेल (Coconut oil) केस गळती थांबवण्यासाठी अतिशय गुणकारी आहे. जर केसांना नारळाच्या तेलाने मसाज केला तर प्रथिनांची क्षती रोखली जाते तसेच केस मऊ आणि सतेज होण्यास मदत होते. नारळाचे दूध डोक्यावर चोळल्यानेही असेच चांगले परिणाम दिसून येतात.

केसांना कांद्याचा रस (onion juice) लावला तरी केसांच्या वाढीस मदत होते आणि पर्यायाने टक्कल कमी होण्यास मदत होते.

मेथी (fenugreek) वाटून तिची पाण्यात पेस्ट केली आणि ती केसांना लावली तरी केस गळणे कमी होण्यास मदत होते.

बीट आणि मेंदी (Beetroot and henna) पावडर ह्यांना एकत्र पाण्यात कालवून, त्यांची पेस्ट केसाला लावल्यास केस गळने कमी होते.

कोरफड (aloe vera gel) केसांचे गळणे थांबवण्यासाठी अतिशय परिणामकारक आहे. कोरफडीचा गर केसाला लावल्यास केस गळणे थांबते तसेच केसांची वाढ होण्यास मदत होते आणि केस मऊ आणि मजबूत होतात.
आवळ्याची पावडर आणि लिंबाचा रस डोक्याला लावल्यास केस गळण्याचे प्रमाण कमी होते तसेच केसांना चमक येते.

रोजमेरीचे तेल (rosemary oil) केसांना लावल्यास केस गळणे कमी होते.

शरीरातील लोहाचे प्रमाण कमी असल्यास केस गळण्याची समस्या उद्भवू शकते. त्यामुळे केस गळण्यावरील एक परिणामकारी उपाय म्हणजे लोहयुक्त पदार्थांचे सेवन करणे.

डॉ. सौरभ शंकर भोईर
 9594606693
 श्रीं गणेश वेदाज क्लिनिक
 डोंबिवली वेस्ट

No comments:

Post a Comment

Popular Posts

Blog Archive

Total Pageviews