देहदेऊळामधें बैसला । न भजतां मारितो देहाला । म्हणौनि त्याच्या भेणें तयाला । भजती लोक ।।

।। दास-वाणी ।। 

देहदेऊळामधें बैसला । 
न भजतां मारितो देहाला । 
म्हणौनि त्याच्या भेणें तयाला । 
 भजती लोक ।। 

जे वेळेसी भजन चुकलें । 
तें तें तेव्हां पछ्याडिलें । 
आवडीने भजो लागले । 
सकळ लोक ।। 

।। जय जय रघुवीर समर्थ ।। 
 दासबोध : १७/०१/०६-०७ 

मुख्य परमात्मा जीवात्म्याच्या रूपात 
प्रत्येक शरीरात राहातोय.
त्यामुळे प्रत्येक देह हे जणू देऊळच बनलय.
जीवात्म्याला शब्द स्पर्श रूप रस गंध हा 
पाच विषयांचा नैवेद्य नेमका आणि नियमीत 
दिला तर तो संतुष्ट होईल . देह धडधाकट राहील.
या सुदृढ देहाने मुख्य परमात्म्याची
 नित्य उपासना केलीच पाहिजे. 
 ती जर घडली नाही तर पुन्हा पुन्हा जन्म आणि मरण.
जीवाला हे फेरे चुकवायचे असतील तर उपासना घडते.
 नाहीतर विषयासक्त बद्ध जीव भौतिक सुखातच
 धन्यता मानून जगत राहातात.

आपल्या हातून भजन किंवा उपासना 
जेव्हा जेव्हा होत नाही तेव्हा ईश्वरच पश्चात्तापाची
भावना निर्माण करतो. याला मुमुक्षत्व म्हणतात.
त्यानंतर आपोआपच माणूस भजन भक्तीकडे
खेचला जातो . त्याचीच पुढे गोडी लागते.
तेव्हा तो खरा साधक बनतो.

अशा पद्धतीने पूर्वसुकृतानुसार प्रापंचिकाचे 
पारमार्थिक मार्गक्रमण सुरू होते.

देवबळात्कार समास.

No comments:

Post a Comment

SPREAD WELLNESS SPREAD AYURVEDA
Link copied! Ready to paste on Instagram.

Popular Posts

Mapping your wellness journey...

Blog Archive

🌿 AYURVEDA INTELLIGENCE

Ayurveda Global Insights & Research

Analyzing latest trends...

Join the Initiative

Get weekly Ayurvedic research in your inbox.

Locate Ayurveda Initiative Near You



Get Directions

Total Pageviews