Skip to main content
🌿 The Science of Life — Ayur (Life) + Veda (Knowledge)

याकारणे पदार्थज्ञान । नाना जिनसीचा अनुमान । सर्व सांडून निरंजन । धुंडीत जावे ।।

।। दास-वाणी ।। 

याकारणे पदार्थज्ञान । 
नाना जिनसीचा अनुमान । 
सर्व सांडून निरंजन । 
धुंडीत जावे ।। 

अष्टांग योग पिंडज्ञान । 
त्याहून थोर तत्वज्ञान । 
त्याहून थोर आत्मज्ञान । 
तें पाहिलें पाहिजे ।। 

।। जय जय रघुवीर समर्थ ।। 
 दासबोध : १७/०३/२३-२४ 

सर्व दृष्य पदार्थ आणि वस्तुंचे ज्ञान हे 
नेहमीच सीमित असते. तो निव्वळ अंदाज असतो.
शास्त्रशुद्ध अंदाज म्हणा हवं तर. 
दृष्य गोष्टींचे नाम रंग रूप ज्ञानेद्रियांना भुलवून टाकते ,
हे खरेच आहे.सामान्य माणसाला आकर्षित करते.
जे आवडते ते पुन्हा हवेसे वाटते.
पंरतु हया दिखाऊ आणि नाशवंत गोष्टी 
असल्याने त्यामधे कधीच अडकून पडू नये.
आसक्ती सोडून निरंजन म्हणजे परब्रह्माचा
शोध घेत रहाणे हेच हितकर आहे.

पिंड म्हणजे देह. अष्टांग योग हा देहप्रधान आहे.
पिंडज्ञान हे त्यात महत्वाचे मानले आहे.
आत्म अनात्म, सार असार, नित्य अनित्य हया
तत्वज्ञानाचा विचार पिंडज्ञानापेक्षा श्रेष्ठ अाहे.
तत्वज्ञानामधे द्वंद्व आहे.साधकाने निवड करायची आहे.
परंतु आत्मज्ञान हे एकमेव आहे.
सर्वश्रेष्ठ आहे. ते ज्याला होईल तो सिद्धच ! 

श्रवणनिरूपण समास.
Share this article
💬 Discuss This on WhatsApp