Skip to main content
🌿 The Science of Life — Ayur (Life) + Veda (Knowledge)

भ्रमास म्हणे परब्रह्म । परब्रह्मास म्हणे भ्रम । ज्ञातेपणाचा संभ्रम । बोलोन दाखवी ।।


।। दास-वाणी ।। 

भ्रमास म्हणे परब्रह्म । 
परब्रह्मास म्हणे भ्रम । 
ज्ञातेपणाचा संभ्रम । 
बोलोन दाखवी ।। 

।। जय जय रघुवीर समर्थ ।। 
दासबोध : १७/०४/१५ 

जे आहे ते नाही असे वाटणे.
जे नाही ते आहे वाटणे.
जे जसे आहे त्यापेक्षा ते विपरीत भासणे .
ह्या सर्व गोष्टी म्हणजे भ्रम.
सर्वं खलु इदं ब्रह्म । 
 प्रचीती शिवाय तोंडपाठ केलेल्या या वाक्यानुसार 
 दृश्य अशाश्वत भ्रमरूप जगताला परब्रह्म 
 म्हणून बसतो.
 परब्रह्माला ब्रह्मस्वरूप झाल्याशिवाय जाणताच
 येत नाही. हा अर्धवट ज्ञानी तिथपर्यंत पोहोचूच
 शकत नसल्याने शाश्वत चिरंतन अशा ब्रह्माला मात्र
 साळसूदपणे भ्रमरूप ठरवतो.
 कोल्हयाला द्राक्षे आंबटच !
 
 ब्रह्मं सत्यं जगत् मिथ्या । 
 हे न जाणणारे पढतमूर्ख ज्ञानीपणाचा डांगोरा
 पिटत सामान्यजनांना भुलवत राहातात.
भोवती गोळा झालेले बद्ध प्रापंचिक माना
डोलवत राहातात. मोक्षापासून मात्र दूरच असतात.

अनुमाननिरसन समास.
Share this article
💬 Discuss This on WhatsApp