Skip to main content
🌿 The Science of Life — Ayur (Life) + Veda (Knowledge)

नाना रसें रोग कठिण । म्हणोंनी औषधी केल्या निर्माण । परंतु सृष्टीचे विवरण । कळलें पाहिजे ।।

।। दास-वाणी ।। 

नाना रसें रोग कठिण । 
म्हणोंनी औषधी केल्या निर्माण । 
परंतु सृष्टीचे विवरण । 
कळलें पाहिजे ।। 

देहेमूळ रक्त रेत । 
त्या आपाचे होती दात । 
ऐसीच भूमंडळी प्रचित । 
नाना रत्नांची ।। 

।। जय जय रघुवीर समर्थ ।। 
 दासबोध : १६/१०/१६-१७ 

अनेक प्रकारचे दुर्धर रोग बरे व्हावेत म्हणून 
ईश्वरी सृष्टीमधे विविध रसांच्या औषधी निर्माण झाल्या.
सृष्टीचे मूळ स्वरूप मात्र जाणून घेतले पाहिजे.

देहाचे मूळ आहे रक्त आणि रेत.
हे स्त्रीबीज आणि पूबीज मुळात द्रवरूप आहे.
दोन्ही एकत्र येऊन हाडामासांचा संपूर्ण जीव बनतो.
या द्रवरूप एकत्रीकरणामधून दातांसारखे 
अतिकठीण पदार्थही बनतात.
पृथ्वीही प्रथम द्रवरूपच होती तरीही
या पृथ्वीमधे हिरे माणकांसारखी कठिण रत्नेही
तयार होत असतात अशी प्रचीती आहे.
सर्व जडजीवसृष्टीचा आपतत्व हाच आधार आहे.

गुणभूतनिरूपण समास.
Share this article
💬 Discuss This on WhatsApp