Skip to main content
🌿 The Science of Life — Ayur (Life) + Veda (Knowledge)

दिवसरजनीचे प्रकार । चांदिणें आणी अंधकार । विचार आणि अविचार । कैसा निवडावा ।।

।। दास-वाणी ।। 

दिवसरजनीचे प्रकार । 
चांदिणें आणी अंधकार । 
विचार आणि अविचार । 
कैसा निवडावा ।। 

विसर आणी आठवण । 
नेमस्त आणी बाष्कळपण । 
प्रचित आणि अनुमान । 
येणें रितीं ।। 

।। जय जय रघुवीर समर्थ ।। 
 दासबोध : १६/०९/२४-२५ 

सूर्याच्या असण्या नसण्यावर दिवस आणि रात्र ठरते.
चंद्राच्या कलांवर चांदणे आणि अंधार अवलंबून असतो.
बुद्धीच्या योग्यतेनुसार विचार आणि अविचार ठरतो.
परंतु यांचे नेमके स्वरूप कसे ओळखावे ? 

तर विसर आणि आठव यात आठवण जशी श्रेष्ठ.
अजागळ कारभारापेक्षा नेमकेपणा जसा उजवा.
अंदाजपंचे बडबडीपेक्षा प्रत्यक्ष अनुभवाचे बोल 
जसे सरस ठरतात.

त्याचप्रमाणे आत्मअनात्म, सार असार विवेक 
साधकाला योग्य तीच निवड करण्यास भाग पाडतो.

नानाउपासनानिरूपण समास .
Share this article
💬 Discuss This on WhatsApp