Skip to main content
🌿 The Science of Life — Ayur (Life) + Veda (Knowledge)

सकळ मार्ग चालती बोलती । अवतार पंगतीची गती । आत्म्याकरितां होत जाती ।ब्रह्मादिक ।।

।। दास-वाणी ।। 

सकळ मार्ग चालती बोलती । 
अवतार पंगतीची गती । 
आत्म्याकरितां होत जाती ।
ब्रह्मादिक ।। 

नादरूप जोतीरूप । 
साक्षरूप सत्तारूप । 
चैतन्यरूप सस्वरूप । 
द्रष्टारूप जाणिजे ।। 

।। जय जय रघुवीर समर्थ ।। 
 दासबोध : १६/०८/०७-०८ 

हा आत्मा सर्वव्यापी आहे.
ब्रह्मदेवापासून राम कृष्णांपर्यंत सर्व ईश्वरी अवतार
 हे आत्मरूपाचाच साक्षात्कार आहेत.
या आत्मरूपाला जाणून घेण्यासाठीच 
आत्मज्ञानाचे वेगवेगळे उपासनामार्ग आणि
ज्ञानमार्ग उपलब्ध आहेत.

या आत्म्याची नादरूप आणि ज्योतिरूप अशी
आलंबनात्मक नामे आहेत.
तर साक्षी, सत्ता, चैतन्य, सस्वरूप आणि द्रष्टा
ही त्याच आत्मरूपाची निर्गुणवाचक नामे आहेत.
पुरूषोत्तम, रघुत्तम, सर्वोत्तम अशी काही
सगुणसाकार श्रीरामाची आहेत.
तोही आत्मारामच ! 

आत्मारामनिरूपण समास.
Share this article
💬 Discuss This on WhatsApp