Skip to main content
🌿 The Science of Life — Ayur (Life) + Veda (Knowledge)

त्रिगुणांपासून जालीं भूतें । पावली पष्ट दशेतें । त्या भूतांचे स्वरूप तें । विवेकें ओळखावें ।।

।। दास-वाणी ।। 

त्रिगुणांपासून जालीं भूतें । 
पावली पष्ट दशेतें । 
त्या भूतांचे स्वरूप तें । 
विवेकें ओळखावें ।। 

त्यांमधें मुख्य आकाश । 
चौ भूतांमधें विशेष । 
याच्या प्रकाशें प्रकाश । 
सकळ कांहीं ।। 

।। जय जय रघुवीर समर्थ ।। 
 दासबोध : १६/०७/०५-०६ 

निर्गुण ब्रह्मस्वरूपाचे पहिले स्फुरण अंतरात्मा.
अंतरात्मा हाच जगदीश्वर म्हणजे मूळमाया होय.
त्यापासून झाली गुणमाया.
गुणमायेपासून सत्व रज तम हे त्रिगुण.
तमोगुणातून पंचमहाभूते निर्माण झाली.
या पंचमहाभूतांचे खरे स्वरूप आत्मअनात्मविवेकाने
जाणले पाहिजे.

पृथ्वी आप तेज वायू ही स्थूलाकडून सूक्ष्माकडे 
जाणारी महाभूते.
आकाश हे मुख्य आहे. ते सूक्ष्मात सूक्ष्म असल्याने 
सर्वव्यापी आहे. आकाशाची तूलना ईश्वराशी केली
जाते. आकाशाचा चैतन्यप्रकाश हा संपुर्ण 
विश्वाला प्रकाशित करून जातो.
या आकाशरूप महद्भूताला माझे नमन.

महद्भूतनिरूपण समास.
Share this article
💬 Discuss This on WhatsApp