Skip to main content
🌿 The Science of Life — Ayur (Life) + Veda (Knowledge)

चंद्र सूर्य नक्षत्रमाळा । ग्रहमंडळें मेघमाळा । ये ब्रह्मांडी नाना कळा । वायोकरितां ।।

।। दास-वाणी ।। 

चंद्र सूर्य नक्षत्रमाळा । 
ग्रहमंडळें मेघमाळा । 
ये ब्रह्मांडी नाना कळा । 
वायोकरितां ।। 

येकवटलें तें निवडेना । 
कालवलें तें वेगळें होईना । 
तैसें हे बेचाड नाना । 
केवी कळे ।। 

।। जय जय रघुवीर समर्थ ।। 
 दासबोध : १६/०६/१२-१३ 

या ब्रह्मांडामधील विविध चंद्र सूर्य ग्रहमंडळे 
नक्षत्रांच्या माळा लाखो वर्षे ठराविक गतीने 
ठराविक कक्षेमधे फिरत राहातात.
हे वायुतत्वाचे कार्य होय.
इतकेच नव्हे तर पृथ्वीवर बरसणारे ढगांचे थवेच्या थवे 
वायूमुळेच एकत्र येतात. वायूमुळेच पुढे सरकतात.

देहाचे चलन वळण आणि श्वासोच्छ्वास हे वायूचे कार्य.
या वायूच्या सामर्थ्याने एकवटलेली पंचमहाभूते
आता वेगवेगळी करता येत नाहीत.
वायूने कालवलेल्या या पंचीकरणाचे कोडे 
किंवा गुंता हा समजायला सुद्धा कठीॆणच आहे.
कठोर प्रदीर्घ साधनेने क्वचितच काही भाग्यवान
साधकांना हा तत्वझाडा साधतो.
ते सिद्धच बनतात.

वायोस्तवन समास.
Share this article
💬 Discuss This on WhatsApp