Skip to main content
🌿 The Science of Life — Ayur (Life) + Veda (Knowledge)

नाना रस निर्माण जाले । अग्नीकरितां निपजले । माहांरोगी आरोग्य जाले । निमिषमात्रे ।।

।। दास-वाणी ।। 

नाना रस निर्माण जाले । 
अग्नीकरितां निपजले । 
माहांरोगी आरोग्य जाले । 
निमिषमात्रे ।। 

।। जय जय रघुवीर समर्थ ।। 
   दासबोध : १६/०५/१०

सोन्याचा चांदीचा मुलामा, लोखंडाचा रस 
किंवा साखरेचा पाक अग्नीमुळेच तयार होतात.
विविध रसनिर्मिती करणाऱ्या पाकक्रिया 
अग्निशिवाय होऊच शकत नाहीत.
मोठमोठे रोग देखील जठराग्नी प्रज्वलित 
झाल्याशिवाय बरे होऊ शकत नाहीत.
नुसत्या औषधांनी रोग बरे झाल्याचे ऐकिवात नाही.
अहं वैश्वानरो भूत्वा प्राणीनां देहमाश्रित: । 
प्राणापान समायुक्ता पचामि अन्नं चतुर्विधम् ।।
तो परमेश्वर जठराग्नीच्या रूपात पोटामधे राहून 
चाटण्या योग्य, चोखण्या योग्य, चावण्यायोग्य 
आणि पिण्यायोग्य अशा चार प्रकारच्या अन्नपदार्थांचे
पचन करत असतो.
औषधांबरोबर चौरस सात्विक आहाराने रोगाी
दुर्धर आजारातूनही लवकर बरा होतो.
या तेजतत्वाला माझे नमन. 

अग्निनिरूपण समास.
Share this article
💬 Discuss This on WhatsApp