Skip to main content
🌿 The Science of Life — Ayur (Life) + Veda (Knowledge)

कूप बावी सरोवरें । उदंड तळी थोरथोरें । निर्मळें उचंबळती नीरें । नाना देसीं ।।

।। दास-वाणी ।। 

कूप बावी सरोवरें । 
उदंड तळी थोरथोरें । 
निर्मळें उचंबळती नीरें । 
नाना देसीं ।। 

गायेमुखें पाट जाती । 
नाना कालवे वाहाती । 
नाना झऱ्या झिरपती । 
झरती नीरें ।। 

।। जय जय रघुवीर समर्थ ।। 
 दासबोध : १६/०४/०५-०६ 

विहिरी, बारव, मोठी मोठी सरोवरे, 
छोटी छोटी तळी या सर्वांमधून देशोदेशी स्वच्छ मधुर 
असे पाणी सतत उचंबळत असते.
 
डोंगरउतारावरून वाहात येणारे पाणी देखील 
गायेमुख म्हणजे गोमुखातून खाली पडते.
छोटया छोटया पाटांमधून ते शेतांमधे फिरवले जाते.
बांधीव कालव्यांतूनही पाणी वाहातच असते.
जमिनीतून वर येणारे काही नैसर्गिक झरे 
पाण्याची कारंजी उडवत असतात.
तर डोगर दऱ्यांमधील दगडांच्या बेचक्यांमधेही
स्वच्छ पाण्याचे पाझर फुटलेले दिसतात.
जीवनासाठी अत्यंत आवश्यक असे हे आपतत्व
आपोनारायण म्हणून ओळखले जाते.

आपनिरूपण समास.
Share this article
💬 Discuss This on WhatsApp