Skip to main content
🌿 The Science of Life — Ayur (Life) + Veda (Knowledge)

येकास येक संव्हारिती । प्राणी भूमीवरी असती । भूमी सांडोन जाती । कोणीकडे ।।

।। दास-वाणी ।। 

येकास येक संव्हारिती । 
प्राणी भूमीवरी असती । 
भूमी सांडोन जाती । 
कोणीकडे ।। 

गड कोट पुरें पट्टणें । 
नाना देश कळती अटणें । 
देव दानव मानव राहाणें । 
पृथ्वीवरी ।। 

।। जय जय रघुवीर समर्थ ।। 
 दासबोध : १६/०३/०६-०७ 

प्राणी एकमेकांवर हल्ला करतात.
लांब लांबपर्यंत पाठलाग करून ठार मारतात.
मारणारा आणि मरणाराही शेवटपर्यंत 
जमिनीवरच असतात.
ही भूमी किंवा पृथ्वी सोडून ते जातील तरी कुठे ? 

मोठमोठे गडकिल्ले, भव्य तटबंद्या, छोटी मोठी गावे
किंवा विशाल महानगरे देखील पृथ्वीवरच असतात.
त्यांची माहिती मात्र आपल्याला भरपूर देशाटन किंवा 
प्रवास केल्यानेच होऊ शकते.
इतकेच नव्हे तर देवदेवतांच्या असंख्य मूर्ती,
त्याना पूजणारे मानव तसेच न पूजणारे दानव देखील
आपल्याला पृथ्वीतलावरच पाहायला मिळतात.
अशा या विविधतेला सामावून घेणाऱ्या 
बहुरत्ना वसुंधरेला माझे नमन.

पृथ्वीस्तवन समास.
Share this article
💬 Discuss This on WhatsApp