Skip to main content
🌿 The Science of Life — Ayur (Life) + Veda (Knowledge)

प्रपंचिक अथवा पारमार्थिक । कार्य करणें कोणीयेक । दिवसेंविण निरार्थक । सार्थक नव्हे ।।

।। दास-वाणी ।। 

प्रपंचिक अथवा पारमार्थिक । 
कार्य करणें कोणीयेक । 
दिवसेंविण निरार्थक । 
सार्थक नव्हे ।। 

म्हणाल अंध कवित्वें करिती । 
तरी हेहि सूर्याचीच गती । 
थंड जालियां आपुली मती । 
मग मतिप्रकाश कैचा ।। 

।। जय जय रघुवीर समर्थ ।। 
 दासबोध : १६/०२/०७-०९ 

प्रापंचिक दैनंदिन व्यवहार असोत,
की पारमार्थिक पूजा अर्चा साधनेसारखी कर्मे असोत,
दिवस म्हणजे उजेडातच परिपूर्ण होतात.
कार्यसिद्धीसाठी सूर्यप्रकाश अत्यावश्यक आहेच. 
प्रकाशाची देवता सूर्य ही डोळयांची अधिष्ठात्री आहे.

कोणी म्हणेल दृष्टी नसलेले अंधही उत्कृष्ठ काव्य करतात.
होय खरय ते. तरीही ही सूर्याचीच करणी आहे.
सूर्य म्हणजे ऊष्णता. शरीराची ऊष्णता हे 
देहाचे तेजतत्व आहे.
हे तेजच काव्यरचनेची स्फूर्ति आहे.
आपली बुद्धीच जर थंड झाली तर
मतिप्रकाश येणार कुठून ?
बुद्धीला अहर्निश चालना देणाऱ्या या
 आदित्य देवतेला माझे नमन ! 

सूर्यस्तवन समास.
Share this article
💬 Discuss This on WhatsApp