Skip to main content
🌿 The Science of Life — Ayur (Life) + Veda (Knowledge)

वारूळास वाल्मीक बोलिजे । म्हणोनि वाल्मीक नाम साजे । जयाच्या तीव्र तपें झिजे । हृदय तापसाचे ।।


।। दास-वाणी ।। 

वारूळास वाल्मीक बोलिजे । 
म्हणोनि वाल्मीक नाम साजे । 
जयाच्या तीव्र तपें झिजे । 
हृदय तापसाचे ।। 

जो तापसांमाजी श्रेष्ठ । 
जो कवेश्वरांमधें वरिष्ठ । 
जयाचें बोलणें पष्ट । 
निश्चयाचे ।। 

।। जय जय रघुवीर समर्थ ।। 
दासबोध : १६/०१/१४-१५ 

पूर्वी वाल्हा कोळी होता.
आयुष्यात अनेक दुष्ट कर्मे केली.
नारदांनी केलेल्या प्रश्नांनी तो पश्चात्तापदग्ध झाला.
अखंड रामनामाचा संकल्प सोडला.
वर्षानुवर्षे तप केल्यानंतर अंगावर मुंग्याचे वारूळ चढले.
एकाच जागी स्थिर राहिल्याने देहही क्षीण झाला.
जणु वारूळासारखाच पोकऴ झाला.
वारूळाला वल्मिक म्हणतात.
म्हणून वाल्हयाचा पुढे वाल्मिकी ऋषी झाला.
हेच नाव त्यांना शोभतेही !
शतकोटी रामायणाचा लेखक म्हणून अजरामर झाला.

असा हा तपस्व्यांमधील श्रेष्ठ, कवेश्वरांमधेही श्रेष्ठतम 
वाल्मिकी ऋषी.
त्याचे काव्य ईश्वरी कृपेने स्फुरलेले असल्याने,
त्याने रचलेल्या रामायणातील शब्द 
नेमके, स्पष्ट आणि निश्चयात्मक आहेत.
वाल्मिकी ऋषींचे काव्य चिरंतन आहे, राहील.
कवीश्वर वाल्मिकींना माझे नमन.

वाल्मिकिस्तवन समास.
Share this article
💬 Discuss This on WhatsApp