Skip to main content
🌿 The Science of Life — Ayur (Life) + Veda (Knowledge)

उत्तम जाणीवेचा जिनस । समजोन पाहे सावकास । निराभास तें आकाश । भास मिथ्या ।।


।। दास-वाणी ।। 

उत्तम जाणीवेचा जिनस । 
समजोन पाहे सावकास । 
निराभास तें आकाश । 
भास मिथ्या ।। 

उदक पसरे वायो पसरे । 
आत्मा अत्यंतचि पसरे । 
तत्वे तत्व अवघेचि पसरे । 
अंतर्यामी ।। 

।। जय जय रघुवीर समर्थ ।। 
 दासबोध : १५/१०/०५-०६ 

उत्तम जाणीवेचा जिनस म्हणजे शुद्ध परब्रह्म. 
ते आकाशासारखे आहे.ते सर्वव्यापी असल्याने 
वेगळेपणाचा भास परब्रह्माच्या ठायी कधी नसतोच.
आकाश हे परब्रह्माइतकेच सर्वव्यापी आहे.
परंतु त्याचा ऩिळाशार रंग हा मात्र भास आहे.

पाणी हे तर व्यापक आहेच, पण विशिष्ट मर्यादेतच. 
पाण्याहून वायू अधिक सूक्ष्म त्यामुळे तो अधिक व्यापक.
वायूपेक्षा आकाश अधिक सूक्ष्म.
आकाशापेक्षाही आत्मा अधिक सूक्ष्म.
त्यामुळेच आत्मा हा सर्वव्यापी आहे.
आकाश वायू तेज आप पृथ्वी हा निर्मितीचा क्रम.
पृथ्वी हे सर्वात स्थूल तर आकाश सर्वाधिक सूक्ष्म.
कमीत कमी व्यापक पृथ्वी तर सर्वव्यापी आकाश.
स्थूलाकडून सूक्ष्माकडे हा अंतर्यामी म्हणजे आतील
दिशेने प्रवास. यालाच म्हणायचं साधना ! 

सिद्धांत निरूपण समास.
Share this article
💬 Discuss This on WhatsApp