Skip to main content
🌿 The Science of Life — Ayur (Life) + Veda (Knowledge)
📞 💬

जेणें संसारी घातलें । आवघें ब्रह्मांड निर्माण केलें । त्यासी नाहीं वोळखिलें । तोचि पतित ।।

।। दास-वाणी ।। 

जेणें संसारी घातलें । 
आवघें ब्रह्मांड निर्माण केलें । 
त्यासी नाहीं वोळखिलें । 
तोचि पतित ।। 

म्हणौनि देव वोळखावा । 
जन्म सार्थकचि करावा । 
न कळे तरी सत्संग धरावा । 
म्हणिजे कळे ।। 

।। जय जय रघुवीर समर्थ ।। 
 दासबोध : ०६/०१/१४-१५ 

देवाने आधी पंचमहाभौतिक सृष्टी निर्माण केली.
त्यामधे अनेक प्रकारचे जीव निर्माण केले.
त्या सर्वांचे संसाराचे रहाटगाडगे सुरळीत घालून दिले.
संपूर्ण ब्रह्मांडरचनेचा अधिपती जो मुख्य ईश्वर 
त्यालाही जो ओळखत नाही तो पतित मानला जातो.
पतित म्हणजे निव्वळ पापी नाही,
तर पापात्मक परिणाम म्हणजे दारूण दु:ख भोगतो 
तोही पतितच !  
अन्न देतो उदरासी । शरीर विकावे लागे त्यासी । 
मा जेणे घातले जन्मासी । त्यांसी न मने हे कोण ज्ञान ।। 

म्हणून मुख्य देव ओळखून मनुष्यजन्माचे सार्थक करावे.
मोक्षाकडे साधनामार्गाने वाटचाल हे सार्थक मानले जाते.
आपल्याला स्वत:च्या प्रयत्नांनी आत्मस्वरूप 
साध्य होत नसल्यास अनुभूतीप्राप्त संताची संगत
धरून आपले इप्सित प्राप्त करावे.
मनुष्य जन्मातच देवशोधन शक्य आहे ! 

देवशोधन समास.