Skip to main content
🌿 The Science of Life — Ayur (Life) + Veda (Knowledge)
📞 💬

भूतां ऐसा जगदीश । म्हणतां उत्पन्न होतो दोष । याकारणे माहापुरूष । सर्व जाणती ।।

।। दास-वाणी ।। 

भूतां ऐसा जगदीश । 
म्हणतां उत्पन्न होतो दोष । 
याकारणे माहापुरूष । 
सर्व जाणती ।। 

पृथ्वी आप तेज वायो आकाश । 
यां सबाह्य जगदीश । 
पंचभूतांसी आहे नाश । 
आत्मा अविनाशरूपी ।। 

।। जय जय रघुवीर समर्थ ।। 
 दासबोध : ०६/०२/११-१२ 

सर्वं खलु इदं ब्रह्म । याचा अर्थ ..
पंचमहाभूते ही ईश्वरस्वरूप मानावी.
पंचमहाभूते म्हणजे ईश्वर नव्हे.
शब्दश: जो दोन्ही एक आहेत असे म्हणतो,
तो मूर्ख ठरतो.
ब्रह्म आणि पंचमहाभौतिक जगत् 
यामधील भेद माहापुरूष म्हणजे साधुसंत
नक्कीच जाणतात.

पृथ्वी आप तेज वायू आकाश या एकापेक्षा एक
सूक्ष्म पंचमहाभूताच्या आतबाहेर तो जगदीश
म्हणजेच परमात्मा व्यापून पुन्हा शिल्लकच उरलाय.
ज्याला व्यापलय ती पंचमहाभूते कधी ना कधी
नष्ट पावतात.
परंतु तो सर्वव्यापी आत्मा मात्र अविनाशी आहे.

त्याचे अखंड ध्यान हेच ब्रह्मपावन ! 

ब्रह्मपावन समास.