Skip to main content
🌿 The Science of Life — Ayur (Life) + Veda (Knowledge)
📞 💬

येके कल्पनेचे पोटीं । होति जाती अनंत सृष्टी । तया सृष्टीची गोष्टी । साच केवी ।।

।। दास-वाणी ।। 

येके कल्पनेचे पोटीं । 
होति जाती अनंत सृष्टी । 
तया सृष्टीची गोष्टी । 
साच केवी ।। 

कल्पनेचा केला देव । 
तेथे जाला दृढभाव । 
देवालागीं येतां खेव । 
भक्त दु:खें दु:खवला ।। 

।। जय जय रघुवीर समर्थ ।। 
 दासबोध : ०६/०६/३१-३२ 

परब्रह्माच्या ठायी एक स्फुरण झाले.
एकोहं । एकाकी न रमते । 
बहुस्याम् म्हणजे अनेक व्हावेसे वाटले.
हीच कल्पना किंवा माया.
या मायेच्याच पोटी पंचमहाभूतात्मक 
सृष्टी निर्माण झाली.
मग अनंत सृष्टी उत्पत्ती स्थिती लय या
अवस्थांमधून येत जात राहिल्या.
उपजे ते नाशे । हा नियम आहे.
सत्य तर अविनाशी आहे.
म्हणून कल्पनेपासून झालेली सृष्टी सत्य नाही.

आपल्याच कल्पनेने एक देवाची मूर्ती तयार केली.
रोज आराधना, उपासना सुरू झाली.
त्या देवावर दृढ श्रद्धा बसली.
परंतु एखाद्या दिवशी ती मूर्ती चुकून कलंडली
तरी अपशकून झाला, देव कोपला अशा
भावनेने भक्त दु:खी होतो.
याला काय म्हणावे ? 
तर ही मायाच अशाश्वत आणि कल्पनेनेच भारलेली.

सृष्टीकथन समास.