Skip to main content
🌿 The Science of Life — Ayur (Life) + Veda (Knowledge)
📞 💬

देव उपेक्षी थोरपणे । तरी मग त्याचे तो जाणे । अप्रमाण ते श्लाघ्यवाणें । नव्हे किं श्रेष्ठा ।।

।। दास-वाणी ।। 

देव उपेक्षी थोरपणे । 
तरी मग त्याचे तो जाणे । 
अप्रमाण ते श्लाघ्यवाणें । 
नव्हे किं श्रेष्ठा ।। 

देहास लागली उपासना । 
आपण विवेकें उरेना । 
ऐसी स्थिति सज्जना । 
अंतरीची ।। 

।। जय जय रघुवीर समर्थ ।। 
 दासबोध : ०६/०७/४१-४२ 

देव म्हणजे सगुण परमेश्वर.
मी ब्रह्मज्ञानी आहे. मी थोर आहे.
मला सगुणाच्या उपासनेची गरजच काय?
अशा भ्रमामधे जर एखादा राहिला, 
तर मग अवघड होईल.
राम आणि शंकर सुद्धा एकमेकांच्या सगुण 
रूपांची आराधना करायचे हे लक्षात घेता
जाणत्या माणसाने सगुणाची उपेक्षा करणे
शोभत नाही. शास्त्रही तसे सांगत नाही.

देह आहे तोपर्यंत सगुण उपासना आहेच, राहील.
साधू संत आत्मअनात्म विवेकाच्या आधारे
परब्रह्माशी पूर्णत: विलीन झाले असतात.
अशीच त्यांची अंतर्स्थितीही असते.
तरी देखील देहधर्म म्हणून आणि समाजाला
मार्गदर्शन म्हणून ते सगुणाला शेवटपर्यंत 
धरूनच राहातात.
सगुणाचेनि आधारे । निर्गुण पाविजेनि निर्धारे । 
येथ सारासारविचारे । संतसंगे ।। 
बद्धापासून सिद्धापर्यंत हे सर्वांनाच लागू पडते.

सगुणभजन समास.