Skip to main content
🌿 The Science of Life — Ayur (Life) + Veda (Knowledge)

घटय कागद आणावे । जपोन नेमस्त खळावे । लिहिण्याचे सामे असावे । नानापरी ।।

।। दास-वाणी ।। 

घटय कागद आणावे । 
जपोन नेमस्त खळावे । 
लिहिण्याचे सामे असावे । 
नानापरी ।। 

सुऱ्या कातऱ्या जागाईत । 
खळी घोटाळें तागाईत । 
नाना सुरंग मिश्रित । 
जाणोनि घ्यावे ।। 

।। जय जय रघुवीर समर्थ ।। 
 दासबोध : १९/०१/१३-१४ 

लिखाणासाठी उत्तम दाट कागद हवा.
त्यावर काळजीपूर्वक खळ लावून ती सुकू द्यावी.
वेगवेगळया प्रकारचे लिहिण्याचे साहित्य 
जय्यत तयार ठेवावे.

पुस्तकबांधणी सुलभ होण्यासाठी 
कागद विविध आकारात कापण्यासाठी सुऱ्या.
धागे कापण्यासाठी कात्र्या,
रेखांकित करण्यासाठी जागाईत म्हणजे पट्टया.
खळ, तुरटीचे पाणी, तागाईत म्हणजे तागाचा काला.
मिसळण्यासाठी रंगीत सुगंधी द्रव्ये.
हे सर्व लिखाणाचे सामान विचारपूर्वक गोळा 
करून मगच लेखनक्रिया सुरू करावी.

लेखनक्रियानिरूपण समास.
Share this article
💬 Discuss This on WhatsApp