Skip to main content
🌿 The Science of Life — Ayur (Life) + Veda (Knowledge)
📞 💬

दुजेविण अनुभव । हें बोलणेंचि तों वाव । याकारणें नाहीं ठाव । अनुभवासी ।।

।। दास-वाणी ।। 

दुजेविण अनुभव । 
हें बोलणेंचि तों वाव । 
याकारणें नाहीं ठाव । 
अनुभवासी ।। 

अनुभवें त्रिपुटी उपजे । 
अद्वैतीं द्वैतचि लाजे । 
म्हणौनि बोलणें साजे । 
अनुर्वाच्य ।। 

।। जय जय रघुवीर समर्थ ।। 
 दासबोध : ०६/१०/२९-३० 

अनुभव हा नेहमी दुसऱ्या व्यक्तीचा किंवा वस्तूचा येतो.
मी आणि ज्याचा अनुभव मला आला अशा दोन भिन्न
गोष्टी असल्याशिवाय अनुभव सिद्ध च होत नाही.

अनुभव आला म्हटले की तीन गोष्टी उपजतात.
ज्ञाता : जाणून घेतो तो
ज्ञेय : ज्याला जाणून घ्यायचय ती वस्तु.
ज्ञान : त्या वस्तूबद्दल जीवाने जे जाणलय ते.
याला त्रिपुटी म्हणायचे.
परंतु एकदा जाणून अनुभूती आली की
जाणणारा वेगळा शिल्लकच राहात नाही.
द्वैत लाजे म्हणजे नष्ट होते. फक्त अद्वैतच राहाते.
अद्वैत हे शब्दांनी कधीच व्यक्त होत नाही,
म्हणून परब्रह्माशी एकरूपता ही अनुर्वाच्य म्हणतात.
यतो वाचो निवर्तन्ते । 
अप्राप्य मनसा सह । 
हेच परब्रह्माचे यथार्थ वर्णन होय.

देवशोधन दशक. अनिर्वाच्य समास.