Skip to main content
🌿 The Science of Life — Ayur (Life) + Veda (Knowledge)
📞 💬

सार सेविजे श्रेष्ठीं । असार घेईजे वृथापुष्टी । सारअसाराची गोष्टी । सज्ञान जाणती ।।

।। दास-वाणी ।। 

सार सेविजे श्रेष्ठीं । 
असार घेईजे वृथापुष्टी । 
सारअसाराची गोष्टी । 
सज्ञान जाणती ।। 

गुप्त परीस चिंतामणी । 
प्रगट खडें काचमणी । 
गुप्त हेमरत्नखाणी । 
प्रगट पाषाण मृत्तिका ।। 

।। जय जय रघुवीर समर्थ ।। 
 दासबोध : ०६/०९/१०-११ 

सार म्हणजे जे हिताचे ते. जे घ्यायला हवे ते.
असार म्हणजे जे त्याज्य, टाकून द्यायला हवे ते.
श्रेष्ठ माणसे सार निवडून घेतात.
फक्त खाऊन पिऊन पुष्ट झालेले आळशी मात्र
असाराचेच वाटेकरी राहतात.
योग्य अयोग्याची जाण फक्त ज्ञानीजनांनाच असते.

परीस आणि चिंतामणी दुर्मिळ असतात.
शोभेचे खडे काचेचे मणी मात्र कुठेही कधीही मिळतात.
रत्ने हिरे सोने यांच्या खाणी जमिनीमधे खूप खोलवर
असतात. ते काढण्यासाठी विशेष परिश्रम आहेत.
तर दगड आणि माती उघडयावर पडलेले असतात.
त्यांना काही किंमत नसते.

सार शोधन अवघड. प्राप्तीसाठी अथक प्रयत्न हवे.
असार आळशाची नैसर्गिक प्राप्ती.
ते कळून दूर सारणेच फार अवघड ! 

सारशोधन समास.