Skip to main content
🌿 The Science of Life — Ayur (Life) + Veda (Knowledge)

तयामधेंचि असिजे । परी तयास नेणिजे । उमजे भास नुमजे । परब्रह्म ते ।।

।। दास-वाणी ।। 

तयामधेंचि असिजे । 
परी तयास नेणिजे । 
उमजे भास नुमजे । 
परब्रह्म ते ।। 

आकाशामधें आभाळ । 
तेणें आकाश वाटे डहुळ । 
परी तें मिथ्या निवळ । 
आकाशचि असे ।। 

।। जय जय रघुवीर समर्थ ।। 
 दासबोध : ०७/०४/०९-१० 

खरे तर सर्व चराचर सृष्टीमधे परब्रह्म व्यापून असते.
जीवसृष्टी ही ब्रह्मामधेच आकंठ बुडालेली असूनही
एकही जीव परब्रह्माला पूर्णत: जाणत नाही.
कठोर साधनेअंती कधीकधी ते उमजल्याचा भास होतो.
परंतु अनुभूती शिवाय परब्रह्म कोणी जाणले 
असे म्हणता येत नाही.

आकाशामधे ढग दाटून आल्यावर ते गढुळ झालय,
किंवा मळलय असे वाटू शकते.
ढग निघून गेले की स्वच्छ निरभ्र आकाशच दिसते.
परब्रह्मावरही मायेचे आभरण आले की मायिक 
जीवसृष्टीमुळे ते झाकोळल्यासारखे वाटते.
जीवसृष्टीचा निरास झाला की मूळ परब्रह्म
साधकाला स्वच्छ, स्पष्ट दिसू लागते. 
त्या निरभ्र आकाशासारखेच. 
तेच ते निर्मल असे विमलब्रह्म ! 

विमलब्रह्मनिरूपण समास.
Share this article
Discuss This on WhatsApp
Eternal Infinite Bliss

सर्वे भवन्तु सुखिनः

सर्वे सन्तु निरामयाः।

सर्वे भद्राणि पश्यन्तु

मा कश्चिद्दुःखभाग्भवेत।

ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः॥

May all sentient beings be at peace,

may no one suffer from illness,

May all see what is auspicious, may no one suffer.

Om peace, peace, peace.

सभी सुखी होवें,

सभी रोगमुक्त रहें,

सभी मंगलमय घटनाओं के साक्षी बनें

और किसी को भी दुःख का भागी न बनना पड़े।

ॐ शांति शांति शांति॥