Skip to main content
🌿 The Science of Life — Ayur (Life) + Veda (Knowledge)

शब्दब्रह्म तें शाब्दिक । अनुभवेविण माईक । शाश्वताचा विवेक । तेथे नाही ।।


।। दास-वाणी ।। 

शब्दब्रह्म तें शाब्दिक । 
अनुभवेविण माईक । 
शाश्वताचा विवेक । 
तेथे नाही ।।

जे क्षर ना अक्षर । 
तेथें कैंचें मीतिकाक्षर । 
शाश्वताचा विचार । 
तेथेहि न दिसे ।। 

।। जय जय रघुवीर समर्थ ।। 
 दासबोध : ०७/०३/२४-२५ 

प्रदीर्घ अभ्यासानंतर शब्दांमधून समजते ते शब्दब्रह्म.
अखंड साधनेअंती त्याची प्रत्यक्ष अनुभूती येत
नाही तोपर्यंत हे मायेच्या क्षेत्रामधे मोडते.
शाश्वत चिरंतन आत्मा शाब्दिक प्रवचन किंवा श्रवण 
करून अनुभवाला येत नाही.
म्हणून चौदा ब्रह्मांपैकी पहिले शब्दब्रह्म हे मायिकच ! 

दुसरे मीतिकाक्षर म्हणजे एकाक्षरी ब्रह्म.
ते ॐ कार रूपी मानले जाते.
प्रणव किंवा ॐकार ही परब्रह्माची शब्दरूप ओळख.
क्षर म्हणजे नाशिवंत. अक्षर म्हणजे नाश नाही ते.
परब्रह्म क्षर ना अक्षर.
तेथे एकाक्षर प्रणव तरी कसा आणता येईल.
हा ॐ सुद्धा शाब्दिक आहे.
म्हणून दुसरे मीतिकाक्षर ब्रह्म देखील मायिकच ! 

चतुर्दशब्रह्मनिरूपण समास.
Share this article
Discuss This on WhatsApp
Eternal Infinite Bliss

सर्वे भवन्तु सुखिनः

सर्वे सन्तु निरामयाः।

सर्वे भद्राणि पश्यन्तु

मा कश्चिद्दुःखभाग्भवेत।

ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः॥

May all sentient beings be at peace,

may no one suffer from illness,

May all see what is auspicious, may no one suffer.

Om peace, peace, peace.

सभी सुखी होवें,

सभी रोगमुक्त रहें,

सभी मंगलमय घटनाओं के साक्षी बनें

और किसी को भी दुःख का भागी न बनना पड़े।

ॐ शांति शांति शांति॥