Skip to main content
🌿 The Science of Life — Ayur (Life) + Veda (Knowledge)
📞 💬

ते परेहूनि पर । मनबुद्धीअगोचर । संग सोडितां सत्वर । पाविजेतें ।।

।। दास-वाणी ।। 

ते परेहूनि पर । 
मनबुद्धीअगोचर । 
संग सोडितां सत्वर । 
पाविजेतें ।। 

संग सोडावा आपुला । 
मग पाहावे तयाला । 
अनुभवी तो या बोला । 
सुखावेल गा ।। 

।। जय जय रघुवीर समर्थ ।। 
 दासबोध : ०७/०२/१८-१९ 

ते म्हणजे परब्रह्म.
जे परा वाणीच्याही पलीकडचे आहे.
ज्याची मनाने कल्पनाही करता येत नाही.
बुद्धीनेही जे जाणता येत नाही.
चारही वाणी, अंत:करण पंचक, ज्ञानेंद्रिये,
कर्मेंद्रिये, त्यांचे सर्व विषय या सर्वांचा 
संग म्हणजे आसक्ती सोडली तर ते
ताबडतोब प्रत्ययाला येते.

आपुला संग म्हणजे मी देह आहे हा देहभाव सोडावा.
मी आत्मा आहे असा निश्चय केल्यास 
जीवाशिवाची लगेचच गाठ पडेल.
देहेबुद्धी ती आत्मबुद्धी करावी । 
या न्यायाने आत्मानुभवी जो असेल त्याला
 हे लगेच उमगेल आणि तो सुखावून मानही डोलावेल.

ब्रह्मनिरूपण समास.
💬 Discuss This on WhatsApp