Skip to main content
🌿 The Science of Life — Ayur (Life) + Veda (Knowledge)

भरम आहे लोकाचारीं । पहिली नांदणूक नाहीं घरीं । दिवसेंदिवस अभ्यांतरीं । दरिद्र आलें ।।

।। दास-वाणी ।। 

भरम आहे लोकाचारीं । 
पहिली नांदणूक नाहीं घरीं । 
दिवसेंदिवस अभ्यांतरीं । 
दरिद्र आलें ।। 

ऐसी घरवात वाढली । 
खातीं तोंडें मिळालीं । 
तेणे प्राणीयांस लागली । 
काळजी उद्वेगाची ।। 

।। जय जय रघुवीर समर्थ ।। 
 दासबोध : ०३/०४/०५-०६ 

यांचे आई वडील गर्भश्रीमंत होते. प्रचंड धनदौलत, 
मानमरातब राखून होते.लोकांमधे प्रतिष्ठा होती.
त्यामुळे हे कुटुंबही संपन्न जीवन जगत असावे,
असा भ्रम समाजात होता.
परंतु प्रत्यक्ष परिस्थिती अगदीच विरूद्ध होती.
उत्पन्न दिवसेंदिवस खालावत होते.
खर्च मात्र काही केल्या कमी होईना.
साहजिकच घरावर दारिद्र्याची कळा आलेली.

घरातला व्याप वाढला . वर्दळ तितकीच राहिली.
खाणारी तोंडे आणि त्यांची भूक वाढतच चालली.
लेकुरें उदंड जालीं । 
तो ते लक्ष्मी निघोन गेली । 
वाढत्या गरीबीची चिंता दोघा नवराबायकोला 
आता वाटू लागली.
हातातोंडाशी गाठ पडेना, उपासमार होऊ लागली.
प्रपंचाचा आत्यंतिक उबग आला.
परंतु पर्यायच नव्हता. 
अविचाराने आपणच वाढवलेला कुटुंबकबिला 
आता यक्षप्रश्न बनून समोर उभा ठाकला.
सुखासाठी मांडलेल्या प्रपंचाची फरपट सुरू झाली.
सुख सुख म्हणता हे दु:ख ठाकोनि आले । 
प्रपंच करावा नेटका । 
यातील नेटकेपण नेमके न समजल्याचा हा परिणाम ! 

स्वगुणपरीक्षा ( क) समास.
Share this article
💬 Discuss This on WhatsApp