Skip to main content
🌿 The Science of Life — Ayur (Life) + Veda (Knowledge)

पुढें गेला विदेशासी । प्राणी लागला व्यासंगासी । आपल्या जिवेसीं सोसी । नाना श्रम ।।

।। दास-वाणी ।। 

पुढें गेला विदेशासी । 
प्राणी लागला व्यासंगासी । 
आपल्या जिवेसीं सोसी । 
नाना श्रम ।। 

ऐसा दुस्तर संसार । 
करितां कष्टला थोर । 
पुढें दोनी च्यारी संवत्सर । 
द्रव्य मेळविलें ।। 

।। जय जय रघुवीर समर्थ ।। 
 दासबोध : ०३/०५/०१-०२ 

माझ्याच मुलाबाळांची हौस मी तुटपुंज्या 
पगारात भागवू शकत नाही.
त्यांना दु:खी झालेले मी पाहू शकत नाही.
म्हणून खिन्न होऊन, मान खाली घालून  
घरदार, पत्नी आणि मुले यांना सोडून 
अधिक धनप्राप्तीसाठी तो दूर देशी निघून गेला.

परदेशात गेल्यावर तो झपाटून कामाला लागला.
जिवाची पर्वा न करता त्याने अहोरात्र काबाडकष्ट
केले. संसाराचा आपणच वाढवलेला गाडा 
ओढण्यासाठी अपार कष्ट केले.
बायको मुलांची सतत येत असलेली आठवण 
त्याने काळजावर दगड ठेवून सोसली.
दोन चार वर्षे प्रचंड मेहनत करून पुष्कळ 
धनदौलत मिळवली.
एकटा उपभोग घेणार किती आणि कसा ? 
कुटुंबियांच्या ओढीने सगळे जमवलेले द्रव्य 
घेऊन तो आता ताठ मानेने स्वदेशी परतला.
निघताना तो दु:खी होता.
परतताना तो अत्यंत उत्साही आनंदी होता.
इथे मात्र वेगळेच दु:ख समोर वाढून ठेवले होते.
सुख दु:खाचा हिंदोळा म्हणजे प्रपंच.
चिरंतन समाधानासाठी परमार्थच हवा ! 

स्वगुणपरीक्षा ( ड ) समास.
Share this article
💬 Discuss This on WhatsApp