Skip to main content
🌿 The Science of Life — Ayur (Life) + Veda (Knowledge)

नीती सांडूनियां तत्वतां । करूं नये तेंचि करितां । येमयातना भोगिता । जीव जाये ।।

।। दास-वाणी ।। 

नीती सांडूनियां तत्वतां । 
करूं नये तेंचि करितां । 
येमयातना भोगिता । 
जीव जाये ।। 

डोळे झांकून स्वार्थबुद्धी । 
नाना अभिळाश कुबुद्धी । 
वृत्ति भूमिसिमा सांधी । 
द्रव्य दारा पदार्थ ।। 

।। जय जय रघुवीर समर्थ ।। 
 दासबोध : ०३/०८/०५-०६ 

शुभ अशुभ कर्मानुसार स्वर्ग सुख किंवा 
नरकयातना भोगाव्या लागतात.
मृत्यूनंतर जीवाला भोगावे लागणारे दु:ख 
म्हणजे आधिदैविक ताप होत.
नीती म्हणजे धर्माचा कायदा.
तो ईश्वरनिर्मित असल्याने त्यात वारंवार 
आपल्या सोयीनुसार आणि मर्जीनुसार 
बदल अथवा दुरूस्ती करता येत नाही.
नीतीतत्वे सोडून जे वर्तन घडते ते अनीती म्हणायचे.
नेमक्या नको त्याच गोष्टी हातून घडतात.

स्वार्थी वृत्तीने योग अयोग्याकडे डोळेझाक होते.
अनेक अभिलाषा मनात निर्माण होतात.
सद् बुद्धी लोप पावते. कुबुद्धी देहाचा ताबा घेते.
साहजिकच स्वैराचारी वर्तन सुरू होते.
दुसऱ्याची जमीन हडप करणे,
वस्तूंची पळवापळवी, स्त्री किंवा संपत्ती बळकावणे 
अशा पापात्मक गोष्टी घडतात.

कर्मविपाकाच्या सिद्धांतानुसार 
याच जन्मी, मृत्यूनंतर नरकलोकी किंवा 
पुढील जन्मामधे कधी ना कधी हे सर्व भोगावेच लागते.
जो जे करतो, तो तेच भोगतो.

आधिदैविकताप समास.
Share this article
💬 Discuss This on WhatsApp