Skip to main content
🌿 The Science of Life — Ayur (Life) + Veda (Knowledge)

नीती सांडून मागें । अनीतीनें वर्तो लागे । गर्व धरून फुगे । सर्वकाळ ।।

।। दास-वाणी ।। 

नीती सांडून मागें । 
अनीतीनें वर्तो लागे । 
गर्व धरून फुगे । 
सर्वकाळ ।। 

पूर्वजांस सिंतरिलें । 
पक्षश्राद्धहि नाहीं केले । 
कुळदैवत ठकिलें । 
कोणेपरी ।। 

।। जय जय रघुवीर समर्थ ।। 
दासबोध : ०३/०३/०८-०९ 

संसारात अडकलेला प्रपंचात गुरफटलेला 
बद्ध जीव भौतिक सुखामधे लोळत असतो.
त्या नश्वर सुखामागे धावता धावता नीतीचा 
मार्ग बाजूला पडतो.
अनीती अनाचार हेच त्याचे कायमस्वरूपी 
वर्तन राहाते. 
संपत्ती आणि वैभवाचा त्याला गर्व चढतो.
समृद्धीच्या गर्वाने तो फुगून जातो.

मग नित्य नैमित्तिक कर्मे त्याला गौण वाटू लागतात.
ज्यांच्यामुळे नावलौकिक मिळाला त्या पूर्वजांचा विसर पडतो.
त्यांच्या आत्म्याच्या उत्तम गतीसाठी केली जाणारी
 श्राद्धकर्मेही टाळली जातात.
 कुलदैवत कुळाचार तर अडगळीतच टाकले जातात.
 या बद्ध जीवाला आपण बांधले गेलो आहोत
 हे देखील स्वार्थापोटी समजत नाही.
 पारमार्थिक उन्नतीची त्याला आवश्यकताही 
 वाटत नाही. देहाचे लाड हेच जीवन असे मानणारे
 बद्ध बहुसंख्यांक आहेत.

स्वगुणपरीक्षा (ब) समास.
Share this article
💬 Discuss This on WhatsApp