।। दास-वाणी ।।
याकारणें ज्ञानासमान ।
पवित्र उत्तम न दिसे अन्य ।
म्हणौन आधी आत्मज्ञान ।
साधिलें पाहिजे ।।
सकळ उपदेशीं विशेष ।
आत्मज्ञानाचा उपदेश ।
येविषईं जगदीश ।
बहुतां ठाईं बोलिला ।।
।। जय जय रघुवीर समर्थ ।।
दासबोध : ०५/०४/३२-३३
या जगातील सगळी शास्त्रे आत्मसात करा.
सर्व दैवंताच्या यथासांग प्रदीर्घ उपासना करा.
भगवंतापाशी पोहोचण्यासाठी ही उत्तम साधने आहेत.
तरीदेखील
न हि ज्ञानेन सदृशं पवित्रं इह विद्यते ।
म्हणून अात्मज्ञानाइतके पवित्र असे दुसरे काहीच नाही.
आत्मज्ञानापेक्षा श्रेष्ठ असेही काहीच असत नाही.
म्हणून आधी आत्मज्ञानप्राप्तीच साधली पाहिजे.
मंत्र तंत्र जप जाप्य तीर्थाटन यापैकी कोणत्याही
उपदेशांमधून केलेल्या कृतीपेक्षा गुरूमुखांतून
झालेला आत्मज्ञानाचा उपदेशच सर्वश्रेष्ठ असून
मुक्तीचा तो एकमेव मार्ग आहे असे भगवंतांनी
अनेक ठिकाणी सांगितले आहे.
मयि एव मन आधत्स्व ।
मयि बुद्धी निवेशय ।
माझ्या ठायीच मन आणि बुद्धी एकरूप कर.
तू आत्मज्ञानी सहजच होशील.
असा साधकाला भगवंत उपदेश करतात.
उपदेशलक्षण समास.
Verified Ayurveda Physicians
Ayurveda Experts Online
Connect with trusted Ayurvedic doctors and Panchakarma specialists across Mumbai, Navi Mumbai, Thane, Dombivli, Kalyan, Ambernath, Badlapur, Karjat & Panvel.
No doctors match your search — try a different name, specialty or city.