।। दास-वाणी ।।
शिष्य पाहिजे प्रज्ञावंत ।
शिष्य पाहिजे प्रेमळ भक्त ।
शिष्य पाहिजे नीतिवंत ।
मर्यादेचा ।।
शिष्य पाहिजे युक्तिवंत ।
शिष्य पाहिजे बुद्धिवंत ।
शिष्य पाहिजे संतासंत ।
विचार घेता ।।
।। जय जय रघुवीर समर्थ ।।
दासबोध : ०५/०३/२६-२७
प्रज्ञा ही विशेषत्वाने तर्कशुद्ध विचार करणारी
बुद्धी आहे. शिष्य प्रज्ञावंत असला पाहिजे.
भगवंताविषयी नितांत प्रेम शिष्याकडे असलेच पाहिजे.
तसेच त्याच्यापाशी न्यायनीती आणि मर्यादाही हवी.
प्रापंचिक आणि पारमार्थिक अडचणींमधून
मार्ग काढण्यासाठी शिष्य हा युक्तिवान हवा.
वेद वेदांतामधील तत्वे समजण्यासाठी शिष्याकडे
सूक्ष्म आणि तरल बुद्धीही हवी.
सत्य असत्याचा विवेक असलेला शिष्यच
योग्य अयोग्याचा निवाडा करू शकतो.
सर्वगुणसंपन्न सात्विक असा सत् शिष्यच
सद् गुरूपदेशाचा अधिकारी असतो.
शिष्यलक्षण समास.
Verified Ayurveda Physicians
Ayurveda Experts Online
Connect with trusted Ayurvedic doctors and Panchakarma specialists across Mumbai, Navi Mumbai, Thane, Dombivli, Kalyan, Ambernath, Badlapur, Karjat & Panvel.
No doctors match your search — try a different name, specialty or city.