।। दास-वाणी ।।
बहुत ज्ञाती नागवलीं ।
कामनेने वेडीं केलीं ।
कामना इच्छितांच मेलीं ।
बापुडी मूर्खें ।।
निशेष कामनारहित ।
ऐसा तो विरूळा संत ।
अवघ्यावेगळें मत ।
अक्षै ज्याचे ।।
।। जय जय रघुवीर समर्थ ।।
दासबोध : ०५/०२/३७-३८
ज्ञानी आहे, पंडित आहे परंतु मनात लोभ आहे.
कामना आणि आकांक्षांनी लिडबिडलेला आहे.
इच्छा अतृप्त राहूनच याच्या आयुष्याची अखेर झाली.
असे पढतमूर्ख पुन्हा जन्ममरणाच्या फेऱ्यांमधे
अडकतात कारण जन्म घेेणे लागे वासनेच्या संगे.
एकही वासना ज्याची शिल्लक रहात नाही,
असे संतसज्जन खरे तर दुर्मिळच !
निष्काम भक्तीनेच भगवंत भेटतो.
देव भावाचा भुकेला. असे म्हटलय.
भौतिक लाभाची अपेक्षा ती दुराशा.
मनात कामना ठेवून कीर्तन निरूपण करणारे
गुरू कितीही मोठे पंडित असले तरी ते खोटेच !
नुसतेच शब्दज्ञानी आणि पोटार्थी.
गुरूलक्षण समास.
Verified Ayurveda Physicians
Ayurveda Experts Online
Connect with trusted Ayurvedic doctors and Panchakarma specialists across Mumbai, Navi Mumbai, Thane, Dombivli, Kalyan, Ambernath, Badlapur, Karjat & Panvel.
No doctors match your search — try a different name, specialty or city.