।। दास-वाणी ।।
नाना पशूंची परीक्षा ।
नाना पक्ष्यांची परीक्षा ।
नाना भूतांची परीक्षा ।
हे ज्ञान नव्हे ।।
नाना धातूंची परीक्षा ।
नाना नाण्यांची परीक्षा ।
नाना रत्नांची परीक्षा ।
हे ज्ञान नव्हे ।।
।। जय जय रघुवीर समर्थ ।।
दासबोध : ०५/०५/०८-१०
पाळीव तसेच जंगलामधील पशूंविषयी,
सखोल ज्ञान असणे.
पक्ष्यांच्या विविध प्रजातींची उत्तम पारख असणे.
भूत खेते पिशाच्च योनी, त्यांची बाधा आणि
त्यावरील मंत्रोपचारांची जाण असणे.
हे व्यावहारिक सामान्य ज्ञान आहे.
याला ' ज्ञान ' असं काही म्हणता येणार नाही.
विविध धातू, त्यांची मिश्रणे, धातूच्या वापरामधून
तयार होणारी शस्त्रे अस्त्रे किंवा दागदागिने
याविषयी इथ्यंभूत माहिती असणे.
नाणी शिक्के किंवा रत्नांची असलेली विशेष पारख .
हया गोष्टीही व्यवहार ज्ञानातच मोडतात.
उदरनिर्वाह आणि सामाजिक प्रतिष्ठेपुरताच
या सर्व विद्यांचा उपयोग आहे हे निश्चित.
परंतु हे सर्व सामान्यज्ञान आहे.
ज्ञान म्हणिजे आत्मज्ञान ।
ही एकमेव ज्ञानाची व्याख्या आहे.
पाहावे आपणांसी आपण ।
यां नाव ज्ञान ।।
असेही ज्ञानाविषयी म्हटलय.
बहुधाज्ञानसमास.
Verified Ayurveda Physicians
Ayurveda Experts Online
Connect with trusted Ayurvedic doctors and Panchakarma specialists across Mumbai, Navi Mumbai, Thane, Dombivli, Kalyan, Ambernath, Badlapur, Karjat & Panvel.
No doctors match your search — try a different name, specialty or city.