।। दास-वाणी ।।
दृश्य पदार्थ जाणिजे ।
त्यास पदार्थज्ञान बोलिजे ।
शुद्ध स्वरूप जाणिजे ।
या नांव स्वरूपज्ञान ।।
जेथें सर्वचि नाहीं ठाईंचें ।
तेथे सर्वसाक्षत्व कैचें ।
म्हणौन शुद्ध ज्ञान तुर्येचें ।
मानूंचि नये ।।
।। जय जय रघुवीर समर्थ ।।
दासबोध : ०५/०६/०७-०८
जे दिसते. ज्याला रंग रूप आकार आहे.
त्याला पदार्थ म्हणतात.
सर्वांगाने पदार्थ कळणे, समजणे हे पदार्थज्ञान.
तर मी देह नावाचा पदार्थ नसून माझे शुद्ध स्वरूप
आत्मा हेच आहे. हे स्वरूपज्ञान होय.
सर्वं खलु इदं ब्रह्म । यामधील जे 'सर्व' अस म्हटलय,
त्यालाच वेगळे असे अस्तित्व नाहीये.
जे सर्व दिसतय ते मुळातच घडलेले नाही.
याला अजातवाद म्हणायचं.
अगा जे घडलेचि नाही ।
त्याची वार्ता पुससी कायी ।
जर ' सर्व ' अस्तित्वात नाही तर
सर्वसाक्षी अवस्थेला तरी काय महत्व?
जाणे ब्रह्म जाणे माया ।
या अवस्थेला सर्वसाक्षी तुर्या अवस्था म्हणतात.
ब्रह्मत्वाच्या एकच टप्पा अलिकडली ही
तुर्या देखील अपूर्ण आहे. ते शुद्धज्ञान नव्हेच !
शुद्धज्ञान समास.
Verified Ayurveda Physicians
Ayurveda Experts Online
Connect with trusted Ayurvedic doctors and Panchakarma specialists across Mumbai, Navi Mumbai, Thane, Dombivli, Kalyan, Ambernath, Badlapur, Karjat & Panvel.
No doctors match your search — try a different name, specialty or city.