Skip to main content
🌿 The Science of Life — Ayur (Life) + Veda (Knowledge)

निंदे ऐसे नाहीं दोष । ते मज घडले कीं विशेष । माझे अवगुणीं आकाश । बुडों पाहे ।।

।। दास-वाणी ।। 

निंदे ऐसे नाहीं दोष । 
ते मज घडले कीं विशेष । 
माझे अवगुणीं आकाश । 
बुडों पाहे ।। 

नाही वोळखिले संत । 
नाही अर्चिला भगवंत । 
नाहीं अतित अभ्यागत । 
संतुष्ट केले ।। 

।। जय जय रघुवीर समर्थ ।। 
दासबोध : ०५/०८/११-१२ 

प्रपंचातच गुंतलो ही मोठी चूक झाली.
हे ज्याला नीट कळले तो मुमुक्षु. 
व्यवहारामधे राहून अनेकांची निंदा आयुष्यभर
करत राहिलो. खर तर परनिंदा हे घोर पातक
मी कायमच यथेच्छ करत राहिलो.
याव्यतिरिक्त माझे इतके अवगुण आहेत,
की त्यामधे आकाशही बुडून जाईल.

सुख समृद्धीमधे डुंबत असताना कधी 
संत सज्जनांचे महत्व जाणून घ्यायचा प्रयत्नही
केला नाही.त्यांना मानसन्मान देणे तर दूरच. 
भगवंताची रोजची पूजाअर्चाही कधी यथासांग
हातुन घडली नाही.
अतिथी म्हणजे बोलावलेला पाहुणा,
अभ्यागत म्हणजे अचानक आलेला पाहुणा.
अशा दोघांचेही स्वागत, आदरातिथ्यही कधी मनापासून
केलेच नाही.जे केले ते उपकाराच्या भावनेने केले.
ऐषारामात आयुष्यभर लोळूनही आत्मिक समाधान 
असे कधी लाभलेच नाही.
 त्यासाठी वेगळाच मार्ग शोधावा
लागेल हे ज्याला उमगले तो मुमुक्षु ! 
बद्धापेक्षा निश्चित उजवा. 

मुमुक्षुलक्षण समास.
Share this article
Discuss This on WhatsApp
Verified Ayurveda Physicians

Ayurveda Experts Online

Connect with trusted Ayurvedic doctors and Panchakarma specialists across Mumbai, Navi Mumbai, Thane, Dombivli, Kalyan, Ambernath, Badlapur, Karjat & Panvel.

Eternal Infinite Bliss

सर्वे भवन्तु सुखिनः

सर्वे सन्तु निरामयाः।

सर्वे भद्राणि पश्यन्तु

मा कश्चिद्दुःखभाग्भवेत।

ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः॥

May all sentient beings be at peace,

may no one suffer from illness,

May all see what is auspicious, may no one suffer.

Om peace, peace, peace.

सभी सुखी होवें,

सभी रोगमुक्त रहें,

सभी मंगलमय घटनाओं के साक्षी बनें

और किसी को भी दुःख का भागी न बनना पड़े।

ॐ शांति शांति शांति॥