।। दास-वाणी ।।
पाहांता देवाचे कृपेसी ।
मातेची कृपा कायेसी ।
माता वधी बाळकासी ।
विपत्तिकाळीं ।।
देव भक्तांचा कैवारी ।
देव पतितांसी तारी ।
देव होये साहाकारी ।
अनाथांचा ।।
।। जय जय रघुवीर समर्थ ।।
दासबोध : ०४/०८/२४-२६
खरेतर आईचे प्रेम सर्वश्रेष्ठ मानले जाते.
परंतु परमेश्वराच्या कृपेपुढे आईची माया
कायम फिकीच प़डेल.
स्वत:च्या अगदी जिवावर बेतल्यावर आई
स्वत:च्या पिल्लाला सुद्धा ठार मारू शकते.
देवाने कधी स्वत:च्या भक्ताचा वध
केल्याचे एकही उदाहरण नाही.
उलट प्रत्येक संकटामधे देवाने भक्ताचा कैवार
घेऊन त्याचे रक्षणच केले आहे.
अगदी पापी पतितांचा सुद्धा देव उद्धारच करतो.
ज्यांचा कोणीही वाली नाही अशा अनाथ
जीवांनाही परमेश्वर मदत करतो.
अडचणींमधून सुखरूप बाहेर काढतो.
मात्र प्रत्येक भक्ताने देवाशी अनन्यभाव राखून
सख्यत्व राखले पाहिजे.
हीच सख्यभक्तीची व्याख्या आहे.
सख्यभक्ती समास .
Verified Ayurveda Physicians
Ayurveda Experts Online
Connect with trusted Ayurvedic doctors and Panchakarma specialists across Mumbai, Navi Mumbai, Thane, Dombivli, Kalyan, Ambernath, Badlapur, Karjat & Panvel.
No doctors match your search — try a different name, specialty or city.