Skip to main content
🌿 The Science of Life — Ayur (Life) + Veda (Knowledge)

पाहाता तत्वविवंचना । पिंडब्रह्मांडतत्वरचना । विश्वाकारें वेक्ती नाना । तत्वे विस्तारली ।।

।। दास-वाणी ।। 

पाहाता तत्वविवंचना । 
पिंडब्रह्मांडतत्वरचना । 
विश्वाकारें वेक्ती नाना । 
तत्वे विस्तारली ।। 

तत्वे साक्षत्वें वोसरतीं । 
साक्षत्व नुरे आत्मप्रचिती । 
आत्मा असे आदिअंतीं । 
आपण कैचा ।। 

।। जय जय रघुवीर समर्थ ।। 
 दासबोध : ०४/०९/१३-१४ 

पिंड म्हणजे देह किंवा शरीर.
ब्रह्मांड म्हणजे अनंत विश्व.
पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश ही
पंचमहाभूते आणि मन बुद्धी अहंकारासकट
अष्टधा प्रकृतीचा पिंड बनतो.
ब्रह्मांडदेखील पंचमहाभूतांचेच बनलेले असते.
पिंडी तेच ब्रह्मांडी । 
विश्वामधेही हीच तत्वे वेगवेगळी रूपे घेऊन 
व्यक्त होतात. 
मूळ तत्वांचाच हा विस्तार आहे हे लक्षात न आल्याने
दिसायला ती भिन्न भिन्न भासतात.

तत्वांचा साक्षीभावाने नीट विचार केला तर
ती भासमान तत्वे म्हणजे मी नव्हेच हे लक्षात येते.
त्यांना बाजूला सारले की मूळ आत्मरूप मीच आहे
हे उमगते.
जीवात्मा हाच ब्रह्म आहे.
हे लक्षात आल्यावर तत्वांचे साक्षीपणही संपते.
अखंड आत्मा पंचमहाभूतांच्या आधीही होता. नंतरही आहे.
हे समजल्यावर पंचमहाभौतिक मी तरी मधे
कसा शिल्लक राहीन.
हे ' मी ' चे समर्पण म्हणजेच आत्मनिवेदन भक्ती होय.
नवविधा भक्तींमधील श्रेष्ठतम नववी भक्ती ! 

आत्मनिवेदनभक्ती समास.
Share this article
Discuss This on WhatsApp
Verified Ayurveda Physicians

Ayurveda Experts Online

Connect with trusted Ayurvedic doctors and Panchakarma specialists across Mumbai, Navi Mumbai, Thane, Dombivli, Kalyan, Ambernath, Badlapur, Karjat & Panvel.

Eternal Infinite Bliss

सर्वे भवन्तु सुखिनः

सर्वे सन्तु निरामयाः।

सर्वे भद्राणि पश्यन्तु

मा कश्चिद्दुःखभाग्भवेत।

ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः॥

May all sentient beings be at peace,

may no one suffer from illness,

May all see what is auspicious, may no one suffer.

Om peace, peace, peace.

सभी सुखी होवें,

सभी रोगमुक्त रहें,

सभी मंगलमय घटनाओं के साक्षी बनें

और किसी को भी दुःख का भागी न बनना पड़े।

ॐ शांति शांति शांति॥