।। दास-वाणी ।।
मुळी ब्रह्म निराकार ।
तेथे स्फूर्तिरूप अहंकार ।
तो पंचभूतांचा विचार ।
ज्ञानदशकीं बोलिला ।।
तो अहंकार वायोरूप ।
तयावरी तेजाचे स्वरूप ।
तया तेजाच्या आधारें आप ।
आवर्णोदक दाटलें ।।
।। जय जय रघुवीर समर्थ ।।
दासबोध : ०४/१०/०१-०२
विश्वाचे मूळ जे परब्रह्म निर्गुण आहे.
त्याला कोणताही आकार नाही म्हणून ते निराकार आहे.
त्याच्या ठायी ' मी एकटा आहे ' म्हणजेच एकोहं ।
असे प्रथम स्फुरण झाले. तोच अहंकार होय.
एकाकी न रमते ।
एकटे एकटे बरे वाटत नाही म्हणून ' बहुस्याम् ' ।
त्यालाच अनेक रूपांत व्यक्त व्हावेसे वाटले.
त्यानंतर ' प्रजायेय । " प्रथम पंचमहाभूते निर्माण झाली,
त्यानंतर सृष्टीनिर्माण म्हणजे चर अचर पदार्थ
तयार झाले.
हे सर्व पुढे आठव्या म्हणजे ज्ञानदशकामधे
विस्ताराने सांगितलच आहे.
यामधे हा जो अहंकार आहे, तो वायूस्वरूप आहे.
पुढे वायूपासून तेजाचे स्वरूप निर्माण झाले.
त्या तेजापासून आप म्हणजे पाणी तयार झाले.
या पाण्याचेच जणु पृथ्वीवर आवरण झाले.
ते आवर्णोदक होय.
निर्गुण निराकार परब्रह्मापासून
सगुण साकार दृश्य सृष्टी अशी निर्माण झाली.
मुक्तिचतुष्टय समास.
Verified Ayurveda Physicians
Ayurveda Experts Online
Connect with trusted Ayurvedic doctors and Panchakarma specialists across Mumbai, Navi Mumbai, Thane, Dombivli, Kalyan, Ambernath, Badlapur, Karjat & Panvel.
No doctors match your search — try a different name, specialty or city.