Skip to main content
🌿 The Science of Life — Ayur (Life) + Veda (Knowledge)

जन्म कुविद्येचे फळ । जन्म लोभाचे कमळ । जन्म भ्रांतीेचें पडळ । ज्ञानहीन ।।

।। दास-वाणी ।। 

जन्म कुविद्येचे फळ । 
जन्म लोभाचे कमळ । 
जन्म भ्रांतीेचें पडळ । 
ज्ञानहीन ।। 

।। जय जय रघुवीर समर्थ ।। 
   दासबोध : ०३/०१/०३

मी आत्मा आहे याची जाण ही सद् विद्या 
तर मी देह आहे अशी पक्की धारणा म्हणजे कुविद्या.
देहाबरोबर वासना आल्याच. त्यांच्या पूर्ततेसाठी
अखंड कर्म. कर्माबरोबरच कर्मफल आले.
वासनापूर्ती कधी होतच नाही.
भोग भोगून शरीर थकते.
मन सदैव अतृप्तच असते.
मृत्यूपर्यंत वासना वाढतच जातात.
जन्म घेणे लागे वासनेच्या संगे । 
या न्यायाने जीव पुन्हा जन्माला येतो ते 
अपूर्ण वासनांच्या तृप्तीसाठीच.
म्हणून जन्म हे कुविद्येचे फळ मानलय.
लोभाच्याच चिखलामधील लोभस कमळ म्हणजे जन्म.
मनुष्य जन्माला येतानाच अज्ञानाचा पडदा 
डोळयावर ओढून येतो.
 भ्रममूलम् इदं जगत । 
 हे न जाणल्यामुळे कालांतराने अज्ञान गडद होत जाते.
 ज्ञानचक्षू उघडलेच जात नाहीत.
 ब्रह्मं सत्यं जगत् मिथ्या । 
 याची अनुभूती येतच नाही.
 पुन्हा पुन्हा जीव जन्म मृत्यूच्या फेऱ्यांमधे अडकतो.

जन्मदु:खनिरूपण समास.
Share this article
💬 Discuss This on WhatsApp