नाहीं भक्तीचें साधन । नाहीं वैराग्य ना भजन । क्रियेवीण ब्रह्मज्ञान । बोले तो येक पढतमूर्ख ।।

।। दास-वाणी ।। 

नाहीं भक्तीचें साधन । 
नाहीं वैराग्य ना भजन । 
क्रियेवीण ब्रह्मज्ञान । 
बोले तो येक पढतमूर्ख ।। 

न मनी तीर्थ न मनी क्षेत्र । 
न मनी वेद न मनी शास्त्र । 
पवित्र कुळीं जो अपवित्र । 
तो येक पढतमूर्ख ।। 

।। जय जय रघुवीर समर्थ ।। 
 दासबोध : ०२/१०/२३-२४ 

नवविधा भक्तीचा प्रचंड अभ्यास केलाय .
परंतु एकाही प्रकारची साधना करत नाही.
साधे भजन तोंडातुन उमटेल तर शपथ.
त्यामुळे परमार्थाची पहिली पायरी विरक्ती,
ती देखील चढता येत नाही.
तोंडात अखंड ब्रह्मज्ञानाची भाषा.
पांडित्य अगदी ओसंडून वाहातय.
कृती मात्र संपूर्ण विपरीत. 
क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे । 
हे देखील ज्याला उमगत नाही तो पढतमूर्खच ! 

पांडित्याच्या अहंकारापोटी तीर्थक्षेत्री यात्रा करणे,
तिथे पूजा अर्चा करणे हे कमीपणाचे मानतो.
खरे तर वेद शास्त्रे शिकूनच मोठा झालाय.
परंतु आता वेदांनाही जुमानत नाही.
स्वत:ची अक्कल शास्त्रांपेक्षा मोठी मानतो.
पूर्वपुण्याईमुळे पवित्र कुळामधे जन्माला येऊनही 
कुळधर्म कुळाचारांना फाटा देऊन 
स्वत: स्वैराचारी जीवन जगतो.
तो शहाणा असूनही मूर्खच ! 
शिक्षित मूर्ख म्हणजे पढतमूर्ख ! 

पढतमूर्खलक्षण समास.

No comments:

Post a Comment

SPREAD WELLNESS SPREAD AYURVEDA
Link copied! Ready to paste on Instagram.

Popular Posts

Ayurveda Library Index

Initializing...

    Mapping your wellness journey...

    Blog Archive

    🌿 AYURVEDA INTELLIGENCE

    Ayurveda Global Insights & Research

    Analyzing latest trends...

    Join the Initiative

    Get weekly Ayurvedic research in your inbox.

    Locate Ayurveda Initiative Near You



    Get Directions

    Total Pageviews