Skip to main content
🌿 The Science of Life — Ayur (Life) + Veda (Knowledge)

सुखा आंग देऊं नये । प्रेत्न पुरूषें सांडूं नये । कष्ट करितां त्रासों नये । निरंतर ।।

।। दास-वाणी ।। 

सुखा आंग देऊं नये । 
प्रेत्न पुरूषें सांडूं नये । 
कष्ट करितां त्रासों नये । 
निरंतर ।। 

सभेमध्ये लाजों नये । 
बाष्कळपणें बोलो नये । 
पैज होड घालूं नये । 
कांही केल्यां ।। 

।। जय जय रघुवीर समर्थ ।। 
 दासबोध : ०२/०२/१४-१५ 

सुखामधे कधीच कोणीही लोळत पडू नये.
 त्याने आळस वाढतो. कार्यक्षमता कमी होते.
कोणत्याही कार्यसिद्धीसाठी अविरत प्रयत्न हवेच,
शिवाय लागेल तितके कष्ट करावे लागले तरी
त्याचा त्रास वाटून घेता कामा नये.
कारण कष्टेवीण फळ नाही । 
कष्टेवीण राज्य नाही । 

महंताने कायम सभेमधे आपले विचार स्पष्टपणे
मांडलेच पाहिजेत. तिथे भीडभाड संकोच नको.
बोलताना विचार नेमके नेटके मोजकेच हवेत.
वायफळ बडबड नको ज्यामुळे लोकांचे लक्ष
विचलीत होऊन उपदेश बाजूलाच राहातो.
पैजा लावणे, भलभलत्या प्रतिज्ञा करणे हया 
सुमार गोष्टी काही झाले तरी महंताने टाळल्याच पाहिजेत.
वचनांची पूर्तता न झाल्यास महंताची विश्वासार्हताच संपते.
कार्यकर्ते दुरावतात. कार्यसिद्धी लांबते.
हे उत्तमलक्षण खचितच नव्हे ! 

उत्तमलक्षण समास.
Share this article
💬 Discuss This on WhatsApp