Skip to main content
🌿 The Science of Life — Ayur (Life) + Veda (Knowledge)

अक्षर बरें वाचणें बरें । अर्थांतर सांगणें बरें । गाणे नाचणें अवघेंचि बरें । पाठांतर ।।

।। दास-वाणी ।। 

अक्षर बरें वाचणें बरें । 
अर्थांतर सांगणें बरें । 
गाणे नाचणें अवघेंचि बरें । 
पाठांतर ।। 

दीक्षा बरी मीत्री बरी । 
तीक्ष्ण बुधी राजकारणी बरी । 
आपणांस राखे नानापरी । 
अलिप्तपणे ।। 

।। जय जय रघुवीर समर्थ ।। 
 दासबोध : १९/०६/१६-१७ 

महंतांसाठी सूचना आहेत या. 
इथे ' बरे ' म्हणजे उत्तम या अर्थाने घ्यायचे.
महंताचे अक्षर उत्तम, सुवाच्य, वळणदार हवे.
वाचनातही स्पष्ट शुद्ध उच्चारण हवे.
सिद्धांत समजावून सांगताना अर्थ आधी
स्वत:ला उमगलेला हवा.
कीर्तन करताना पाठांतर तर हवेच,
परंतु योग्य ते गायन आणि पदन्यासही उत्तमच हवा.
तरच श्रोते भगवत् भक्तीमधे तन्मय होतील.

अशा महंताची घेतलेली दीक्षा कल्याणकारी असते.
म्हणून त्याच्याशी लोकांना मैत्री करावीशी वाटते.
हा महंत राजकारणकुशलही असतो.
त्याच्यामुळे गावकीची असंख्य सामाजिक कार्ये
मार्गी लागतात. 
लोकांना तो अतिशय प्रिय असतो तरीही 
कार्यसिद्धीनंतर तो समाजापासून अलिप्तच राहातो.
मठ करून राहो नये । 
कोठेतरी ।। 
या उक्तीनुसार पुढील कार्यासाठी हा विरक्त,
 गाव सोडून निघून जातो.

बुद्धिवादनिरूपण समास.
Share this article
💬 Discuss This on WhatsApp