Skip to main content
🌿 The Science of Life — Ayur (Life) + Veda (Knowledge)

तांब्रनाणीं हेमनाणीं । कोणी पूजिती देवार्चनीं । चक्रांगीत चक्रतीर्थाहुनी । घेऊन येती ।।

।। दास-वाणी ।। 

तांब्रनाणीं हेमनाणीं । 
कोणी पूजिती देवार्चनीं । 
चक्रांगीत चक्रतीर्थाहुनी । 
घेऊन येती ।। 

उदंड उपासनेचे भेद । 
किती करावे विशद । 
आपलाले आवडीचा वेध । 
लागला जनीं ।। 

।। जय जय रघुवीर समर्थ ।। 
 दासबोध : १९/०५/०३-०४ 

कोणी देवतांचे शिक्के असलेली तांब्याची किंवा
सोन्याची नाणी देव्हाऱ्यात पुजायला घेतात.
कोणी चक्रतीर्थ नावाच्या तीर्थक्षेत्रामधून 
वलयांकित गोटे आणून त्यांची पूजा करतात.
हे विष्णूचे प्रतीक असून त्यांना शालिग्राम असे म्हणतात.

मातीचे, दगडाचे, पितळयाचे किंवा काशाचे देव असोत,
ही विविध उपास्य दैवते असून सर्वच वेगवेगळया
पद्धतीने पुजली जातात.
ज्याची जशी आवड तशी मूर्ती निवडली जाते.
अर्चनभक्तीने उपासना केली जाते.

एकच परमेश्वर विविध रूपांमधे व्यक्त होत असतो.
भक्ताचा भाव त्यापाशी जोडला गेला की तो प्रसन्न होतो.
भाव तोचि देव । हे सगुण भक्तीचे वर्म. 

देहमान्यनिरूपण समास.
Share this article
💬 Discuss This on WhatsApp