Skip to main content
🌿 The Science of Life — Ayur (Life) + Veda (Knowledge)

बहुत जन वास पाहे । वेळेसी तत्काळ उभा राहे । उणें कोणाचें न साहे । तया पुरूषासी ।।

।। दास-वाणी ।। 

बहुत जन वास पाहे । 
वेळेसी तत्काळ उभा राहे । 
उणें कोणाचें न साहे । 
तया पुरूषासी ।। 

चौदा विद्या चौसष्टी कळा । 
जाणे संगीत गायेनकळा । 
आत्मविद्येचा जिव्हाळा । 
उदंड तेथें ।। 

।। जय जय रघुवीर समर्थ ।। 
 दासबोध : १९/०४/११-१२ 

बरेच लोक त्याच्या येण्याची आतुरतेने वाट पाहातात.
प्रत्येकाच्या अडचणींमधे त्याने केलेली तत्पर मदत
सर्वांनाच आठवत असते.
कोणालाही काही कमी पडले तर याच्याच
अंत:करणाला प्रचंड वेदना होतात.

असा निस्पृह महंत अत्यंत विद्वान असतो.
चौदा विद्या आणि चौसष्ट कलांमधे हा निष्णात असतो.
संगीत गायन तालज्ञान यामधेही हा पारंगत असतो.
या सर्व कलांचा उपयोग तो अध्यात्मविद्येच्या
प्रसारासाठीच करतो.

असा बहुआयामी समाजामधे अत्यंत लोकप्रिय
असलेला महंत लोकांना देवासमान वाटला तर
त्यात आश्चर्य ते काय ? 

सदेवलक्षणनिरूपण समास.
Share this article
💬 Discuss This on WhatsApp