Skip to main content
🌿 The Science of Life — Ayur (Life) + Veda (Knowledge)

भक्तिज्ञान वैराग्यलक्षण । नीतिन्यायस्वधर्मरक्षण । साधनमार्ग अध्यात्मनिरूपण । प्रांजळ बोलावे ।।

।। दास-वाणी ।। 

भक्तिज्ञान वैराग्यलक्षण । 
नीतिन्यायस्वधर्मरक्षण । 
साधनमार्ग अध्यात्मनिरूपण । 
प्रांजळ बोलावे ।। 

करावे वेदपारायेण । 
सांगावे जनासी पुराण । 
मायाब्रह्मीचे विवरण । 
साकल्य वदावें ।। 

।। जय जय पघुवीर समर्थ ।। 
 दासबोध : ०४/०२/१६-१९ 

कीर्तनामधे काय काय असावे ? 
नवविधा भक्तीद्वारा परमेश्वराविषयीचे ज्ञान.
ज्ञानप्राप्तीची पहिली पायरी वैराग्याची महती.
नीतीने वागून न्यायाच्या आधारे स्वधर्मरक्षण. 
परमेश्वराच्या प्राप्तीसाठी उपलब्ध विविध साधनामार्ग.
अध्यात्मशास्त्रांचे विस्तृत निरूपण.
या सर्व गोष्टी अत्यंत स्पष्ट आणि परखडपणे 
कीर्तनकाराने श्रोत्यासंमोर मांडल्याच पाहिजेत.

आधी केले मग सांगितले । 
या उक्तीनुसार स्वत: वेद उपनिषदांचा सखोल 
अभ्यास केलाच पाहिजे.
श्रोत्यांना मात्र त्यांना रूचेल पटेल अशा 
सर्वसमावेशक पुराणकथाच सांगाव्या.
सगुण रोचक वाटते. आकलनाला सोपे जाते.
नंतर हळूहळू ' मानत मानत न्यावे पैलीकडे । '
माया ब्रह्माविषयी निरूपण कालांतराने 
सावकाश करावे. निव्वळ पांडित्यप्रदर्शन नको.
असेच कीर्तनकाराचे धोरण असले पाहिजे.
तरच सामान्यजनांना परमार्थाची गोडी लागेल.
यातच कीर्तनाची सार्थकता आहे.

कीर्तनभक्ती समास.
Share this article
Discuss This on WhatsApp
Verified Ayurveda Physicians

Ayurveda Experts Online

Connect with trusted Ayurvedic doctors and Panchakarma specialists across Mumbai, Navi Mumbai, Thane, Dombivli, Kalyan, Ambernath, Badlapur, Karjat & Panvel.

Eternal Infinite Bliss

सर्वे भवन्तु सुखिनः

सर्वे सन्तु निरामयाः।

सर्वे भद्राणि पश्यन्तु

मा कश्चिद्दुःखभाग्भवेत।

ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः॥

May all sentient beings be at peace,

may no one suffer from illness,

May all see what is auspicious, may no one suffer.

Om peace, peace, peace.

सभी सुखी होवें,

सभी रोगमुक्त रहें,

सभी मंगलमय घटनाओं के साक्षी बनें

और किसी को भी दुःख का भागी न बनना पड़े।

ॐ शांति शांति शांति॥