Skip to main content
🌿 The Science of Life — Ayur (Life) + Veda (Knowledge)

वेद वेदगर्भ वेदांत । सिद्ध सिद्धभावगर्भ सिद्धांत । अनुभव अनुर्वाच्य धादांत । सत्य वस्तु ।।

।। दास-वाणी ।। 

वेद वेदगर्भ वेदांत । 
सिद्ध सिद्धभावगर्भ सिद्धांत । 
अनुभव अनुर्वाच्य धादांत । 
सत्य वस्तु ।। 

बहुधा अनुभवाची आंगें । 
सकळ कळती संतसंगें । 
चौथे भक्तीचे प्रसंगें । 
गौप्य तें प्रगटे ।। 

।। जय जय रघुवीर समर्थ ।। 
 दासबोध : ०४/०४/१०-११ 

श्रीगुरूंच्या पादसेवन भक्तीने काय काय साध्य होते?
वेदांचे सम्यक ज्ञान, वेदगर्भ म्हणजे वेदांचा गाभा
ज्याला वेदांत म्हणतात त्याचेही संपूर्ण ज्ञान.
सिद्धपुरूष, सिद्धांचा सिद्धभाव म्हणजे 
जीव ब्रह्माचे ऐक्य.
जीवो ब्रह्मैव नापरा । हा वेदांताचाही मुख्य सिद्धांत.
ही अनुभूती धादांत म्हणजे प्रत्यक्ष असते,
जी अनिर्वाच्य म्हणजे शब्दांमधे कधीच सांगता
येत नाही.
ती सत्य वस्तु म्हणजे परब्रह्म सद् गुरूंच्या
पादसेवन भक्तीनेच प्राप्त होते.

हे सर्व अनुभवाच्याच अंगाने जाणारे आकलन 
संतांच्याच संगतीमधे सारासारविचारे होते.
कठोर साधना, अविचल सद् गुरूनिष्ठा यासाठी
अत्यावश्यक आहे.
निर्गुणाचे गूढ तत्व नवविधा भक्तीमधील चौथ्या 
म्हणजे पादसेवन भक्तीने सहज उकलते.
गुरूने सांगितलेल्या मार्गावर निष्ठापूर्वक मार्गक्रमण 
हीच खरी पादसेवन भक्ती होय.

पादसेवनभक्ती समास.
Share this article
Discuss This on WhatsApp
Verified Ayurveda Physicians

Ayurveda Experts Online

Connect with trusted Ayurvedic doctors and Panchakarma specialists across Mumbai, Navi Mumbai, Thane, Dombivli, Kalyan, Ambernath, Badlapur, Karjat & Panvel.

Eternal Infinite Bliss

सर्वे भवन्तु सुखिनः

सर्वे सन्तु निरामयाः।

सर्वे भद्राणि पश्यन्तु

मा कश्चिद्दुःखभाग्भवेत।

ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः॥

May all sentient beings be at peace,

may no one suffer from illness,

May all see what is auspicious, may no one suffer.

Om peace, peace, peace.

सभी सुखी होवें,

सभी रोगमुक्त रहें,

सभी मंगलमय घटनाओं के साक्षी बनें

और किसी को भी दुःख का भागी न बनना पड़े।

ॐ शांति शांति शांति॥