केशव नारायण माधवमूर्ती ।
गोविंदविष्णूमदसूदनमूर्ती ।
त्रिविक्रमवामनश्रीधरमूर्ती ।
रूषीकेश पद्मनाभि ।।
।। जय जय रघुवीर समर्थ ।।
दासबोध : ०४/०५/१०
अर्चनभक्तीमधे भगवंताच्या विविध सगुण
मूर्तींचे मनोभावे पूजन करावे.
ज्याला काही रंग रूप किंवा आकार आहे ते सगुण.
केशव, नारायण ही विष्णूची रूपे आहेत.
मा म्हणजे लक्ष्मी, धव म्हणजे पती.
लक्ष्मीपती हे ही विष्णूचेच नाव.
गो म्हणजे गायी. गो म्हणजे इंद्रीये.
या दोन्हींची जाण आहे तो गोविंदही विष्णूच.
विष्णू म्हणजे व्यापकता.
सर्वव्यापी, सर्वांचा पालनकर्ता तो विष्णू.
स्थिती म्हणजे जो देहाला टिकवतो तो विष्णू.
मधु नामक दैत्याला मारून टाकतो तो मधुसूदन.
त्रिविक्रम हे ही विष्णूचेच नाम.
बळीला पाताळात लोटणारा बटु वामन अवतार.
श्री म्हणजे लक्ष्मी. धर म्हणजे धारण करतो तो.
श्रीधर म्हणजेदेखील विष्णू.
ऋषिक् म्हणजे इंद्रिये. ईश म्हणजे स्वामी.
इंद्रिये ज्याच्या ताब्यात आहेत तो ऋषिकेशही विष्णूच.
पद्म म्हणजे कमळ. नाभी म्हणजे बेंबी.
पद्म आहे नाभी ज्याच्या तो पद्मनाभ.
अशा भगवान विष्णूंच्या असंख्य मूर्तींचे
मनोभावे सतत पूजन करणे ही नवविधा भक्तीमधील
पाचवी अर्चनभक्ती होय.
अर्चनभक्ती समास.
Verified Ayurveda Physicians
Ayurveda Experts Online
Connect with trusted Ayurvedic doctors and Panchakarma specialists across Mumbai, Navi Mumbai, Thane, Dombivli, Kalyan, Ambernath, Badlapur, Karjat & Panvel.
No doctors match your search — try a different name, specialty or city.