।। दास-वाणी ।।
नमस्कारास वेचावें नलगे ।
नमस्कारास कष्टावें नलगे ।
नमस्कारास कांहीच नलगे ।
उपकर्ण सामग्री ।।
नमस्काराऐसें नाहीं सोपें ।
नमस्कार करावा अनन्यरूपें ।
नाना साधनी साक्षपें ।
कायसा सिणावें ।।
।। जय जय रघुवीर समर्थ ।।
दासबोध : ०४/०६/२२-२३
नमस्काराला काही खर्च नाही.
नमस्काराला शरिराचे कष्टही नाहीत.
नमस्कार करायला काहीच साधन सामुग्री
किंवा उपकरणे देखील लागत नाहीत.
नमस्कारासारखे सोपे सुटसुटीत दुसरे साधन नाही.
फक्त त्या एका परमेश्वराशिवाय मला तारणारे
पृथ्वीतलावर दुसरे कोणीच अशी दृढ भावना मात्र
मनात हवीच.
तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहं ।
माझ्या ठायी नित्य जोडलेल्या भक्तांचा
योगही मीच वाहातो. क्षेमही मीच टिकवतो.
इतकी खात्री भगवंताने स्वत:च दिल्यानंतर
भक्तीसाठी इतर अवघड साधने का वापरावी ?
त्या सर्वसाक्षीला मनापासून नमस्कार ही
नवविधा भक्तीमधील सहावी वंदनभक्ती.
सर्वाधिक सोपी !
वंदनभक्ती समास.
Verified Ayurveda Physicians
Ayurveda Experts Online
Connect with trusted Ayurvedic doctors and Panchakarma specialists across Mumbai, Navi Mumbai, Thane, Dombivli, Kalyan, Ambernath, Badlapur, Karjat & Panvel.
No doctors match your search — try a different name, specialty or city.