Skip to main content
🌿 The Science of Life — Ayur (Life) + Veda (Knowledge)

भुयेरी तळघरें आणि विवरें । नाना स्थळें गुप्त द्वारें । अनर्घ्ये वस्तूंचीं भांडारें । येत्नें करीत जावी ।।

।। दास-वाणी ।। 

भुयेरी तळघरें आणि विवरें । 
नाना स्थळें गुप्त द्वारें । 
अनर्घ्ये वस्तूंचीं भांडारें । 
येत्नें करीत जावी ।। 

आळंकार भूषणें दिव्यांबरें । 
नाना रत्नें मनोहरें । 
नाना धातु सुवर्णपात्रें । 
येत्नें करीत जावी ।। 

।। जय जय रघुवीर समर्थ ।। 
 दासबोध : ०४/०७/१०-११ 

दास्यभक्ती मधे काय काय समाविष्ट आहे ? 
मंदिर संस्थान साठी परकीय आक्रमणापासून 
संरक्षण व्हावे यासाठी तळघरे, खोल विवरे,
दूरवर बाहेर नेऊन सोडणारी खोल भुयारे खणणे.
गुप्त दरवाजे आणि गुप्त वाटा चोर दरवडेखोरांना
थांग लागू न देण्यासाठी.
शिधा, कापडचोपड, पूजेची पालखीची सामग्री
ठेवण्यासाठी विशाल कोठारे प्रयत्नपूर्वक बांधून द्यावी.

याशिवाय देवासाठी उंची दागदागिने, आभूषणे,
भरजरी वस्त्रे, उंची मौल्यवान सुंदर सुंदर रत्ने,
हिरे माणके अर्पण करावी.
तसेच सोन्याचांदीची विविध भांडी आणि पूजेची
उपकरणे आपल्या ऐपतीप्रमाणे विकत घेऊन 
देवाला अर्पण करणे ही देखील दास्यभक्तीच आहे.

या सर्व भौतिक गोष्टींचे अहंकारविरहीत समर्पण
इथे अपेक्षित आहे. हा व्यावहारिक भाग झाला.
याशिवाय उत्सव, जयंती, महोत्सव अशा काळात 
पडेल ती नि:स्वार्थ निरंतर सेवाही दासाकडून घडणे
अत्यावश्यक आहे.
ही नवविधा भक्तीमधील सातवी दास्यभक्ती.
रामाचा हनुमान हे दास्यभक्तीचे सर्वोत्कृष्ठ उदाहरण ! 

दास्यभक्ती समास.
Share this article
Discuss This on WhatsApp
Verified Ayurveda Physicians

Ayurveda Experts Online

Connect with trusted Ayurvedic doctors and Panchakarma specialists across Mumbai, Navi Mumbai, Thane, Dombivli, Kalyan, Ambernath, Badlapur, Karjat & Panvel.

Eternal Infinite Bliss

सर्वे भवन्तु सुखिनः

सर्वे सन्तु निरामयाः।

सर्वे भद्राणि पश्यन्तु

मा कश्चिद्दुःखभाग्भवेत।

ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः॥

May all sentient beings be at peace,

may no one suffer from illness,

May all see what is auspicious, may no one suffer.

Om peace, peace, peace.

सभी सुखी होवें,

सभी रोगमुक्त रहें,

सभी मंगलमय घटनाओं के साक्षी बनें

और किसी को भी दुःख का भागी न बनना पड़े।

ॐ शांति शांति शांति॥