Skip to main content
🌿 The Science of Life — Ayur (Life) + Veda (Knowledge)

उष्णवास जळवास । सीतवास आरण्यवास । भूगर्भ आणि आकाशवास । कैसे ते ऐकावे ।।


।। दास-वाणी ।। 

उष्णवास जळवास । 
सीतवास आरण्यवास । 
भूगर्भ आणि आकाशवास । 
कैसे ते ऐकावे ।। 

जपी तपी तामस योगी । 
नाना निग्रह हटयोगी । 
शाक्त आगम आघोरयोगी । 
कैसे ते ऐकावे ।। 

।। जय जय रघुवीर समर्थ ।। 
 दासबोध : ०४/०२/१२-१३ 

श्रवणभक्ती मधे काय काय ऐकावे ? 
अग्नी पाणी किंवा जळाच्या अखंड सानिध्यात
राहून वर्षानुवर्षे तपस्या करणारे ऋषीमुनी.
वाल्मिकी सारखे सतत जंगलामधे राहून 
तपश्चर्या करणारे ऋषी.
जमिनीखाली खोल भुृयारामधे समाधी लावून
बसणारे योगी पुरूष.
आकाशातून विहार करू शकणारे सिद्धपुरूष 
या सर्वांविषयी जमेल तेवढे भक्तीभावाने
ऐकत राहावे.

याशिवाय अखंड नामजपामधे मग्न असणारे नामजपी.
महर्षी विश्वामित्रांसारखे तपस्वी, दुर्वासमुनींसारखे
तापट ऋषी. 
एका पायावर उभे राहून वर्षानुवर्षे तप करणारे हठयोगी.
शक्तीचे उपासक शाक्त, आगम, शाबरी विद्येसारख्या 
अघोरी शक्तीचे उपासक.
हे सर्व उपासनेचेच प्रकार असल्याने त्यातील 
विविधता ऐकावी, अभ्यासावी.
आपल्याला योग्य ती साधना निवडण्यासाठी
श्रवणभक्तीचा निश्चित उपयोग आहे.

श्रवणभक्ती समास.
Share this article
💬 Discuss This on WhatsApp